शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

महापालिका तिजोरीत सतरा कोटी

By admin | Updated: November 13, 2016 04:24 IST

पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर चलन बदलून घेण्यासाठी तिसऱ्याही दिवशी उद्योगनगरीतील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांसमोर तोबा गर्दी झाली होती.

पिंपरी : पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर चलन बदलून घेण्यासाठी तिसऱ्याही दिवशी उद्योगनगरीतील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांसमोर तोबा गर्दी झाली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना मनस्ताप सहन करून घ्यावा लागला. लांबच लांब लागलेल्या रांगा, बँकांचे विस्कळीत झालेले नियोजन यामुळे स्वत:च्या पैशांसाठीच नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दोन दिवस उलटूनही एमटीएम सेवा बंद होती. दोन दिवसात १७ कोटींचा कर जमा झाला. मिळकत करापोटी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा महापालिकेकडून स्वीकारल्या जात असल्याने शुक्रवारी एकाच दिवसात महापालिकेकडे ‘रेकॉर्ड बे्रक’ भरणा झाला. शुक्रवारी रात्री बारापर्यंत तब्बल १२ कोटी ४५ लाखांचा कर जमा झाला. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा अचानक रद्द केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासह मिळकत करापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयातही स्वीकारल्या जात आहेत. दरम्यान, कर भरण्यासाठी पाचशे, हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्याबाबतची मुदत वाढविण्यात आल्याने शनिवारीही कर भरण्यासाठी गर्दी दिसत होती. शुक्रवारी रात्री बारापर्यंत महापालिकेच्या १६ कार्यालयांमध्ये मिळकत करापोटी पाचशे, हजारच्या नोटा जमा करण्यासाठी मिळकतधारकांनी गर्दी केली होती. यामुळे कार्यालयांसमोर लांबच लांब रांगा दिसत होत्या. यामुळे शुक्रवारी रात्री बारापर्यंत सहा हजार २३१ मिळकतधारकांकडून १२ कोटी ४५ लाख ५० हजार ५१५ इतका कर जमा करण्यात आला. यामध्ये ११ कोटी ८२ लाख ४६ हजार रोख स्वरूपात, तर ५७ लाख २२ हजार धनादेशाद्वारे आणि पाच लाख ८२ हजार आॅनलाईनद्वारे कर जमा केला. मिळकत करापोटी अद्यापपर्यंत एका दिवसात सर्वाधिक १० कोटी ७९ लाखांचा भरणा झाला होता. मात्र, शुक्रवारी तब्बल साडेबारा कोटींचा भरणा झाला. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा हा ‘रेकॉर्ड ब्रेक’ भरणा ठरला. दरम्यान, कर भरण्यासाठी पाचशे, हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्याबाबतची मुदत वाढविण्यात आल्याने शनिवारीही कर भरण्यासाठी गर्दी दिसत होती. शनिवारी सुटीचा दिवस असल्याने नोकरदार वर्गाचे प्रमाण अधिक होते. शनिवारी सायंकाळी चारपर्यंत एक हजार ५७४ मिळकतधारकांनी दोन कोटी ७२ लाखांचा कर जमा केला. यासह रात्री उशिरापर्यंत कर भरणा सुरूच होता. चलनातून बंद झाल्याने अनेक नागरिकांनी अशा नोटा कर भरण्यासाठी उपयोगात आणल्या. त्यामुळे नागरिकांची कराची रक्कम भरली गेली. (प्रतिनिधी)थकबाकीची रक्कमही जमामिळकत करवसुलीसाठी महापालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. अधिकची थकबाकी असल्यास जप्तीची कारवाई देखील केली जाते. तरीही कर वसुली करताना अधिकाऱ्यांची दमछाक होते. मात्र, जुन्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने अनेक दिवसांपासूनची थकबाकीही मिळकतधारकांकडून जमा झाल्याचे दिसून येत आहे. सुट्या पैशांचे कारण देत आदेश केरातअत्यावश्यक सुविधांच्या ठिकाणी पाचशे व हजारांचा नोटा स्वीकारणे बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले. मात्र, शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. निगडी येथील एका मेडिकलमध्ये १६० रुपये किमतीची औषधे खरेदी केल्यानंतर पाचशे रुपयांची नोट दिली. मात्र, उरलेले पैसे देण्यासाठी आमच्याकडे सुटे पैसे नाहीत. त्यामुळे यातील शिल्लक रकमेच्या इतर वस्तूंची खरेदी करावी लागेल किंवा दुसरीकडून औषधे घ्या असे सांगण्यात आले. असाच अनुभव आणखी चार मेडिकल स्टोअरमध्ये आला. थेट नोटा न नाकारता असे सुट्या पैशाचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. पेट्रोलपंप, बिल भरणा केंद्राकडून अडवणूकपेट्रोल, वीज बिले भरण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच मिळकतकर भरण्यास मुदतवाढ दिल्याने करसंकलन कार्यालयात गर्दी दिसून आली. दोन दिवसांत १७ कोटींची वसुली झाली आहे. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच भाजी बाजारात खरेदी करणाऱ्या नागरिकांना सुटे पैसे नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागला.