शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: July 21, 2015 03:42 IST

दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे

किवळे : दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. भात व खरीप पिकासाठी हा पाऊस अत्यंत पोषक असला, तरी भातलागवडीसाठी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.देहूरोड, किवळे, रावेत, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे भागात दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या हलक्या पावसाने पेरणी केलेल्या भुईमूग, कडधान्ये, भातरोपांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या उघडिपीने भुईमूग, घेवडा, मूग, पावटा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते. नदीच्या अगर विहिरीच्या पाण्याची सोय असलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांची भातलागवड झाली असून, पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भातरोपे जळू लागली होती. हा पाऊस भातपीक व खरिपाच्या पिकांसाठी अनुकूल असला, तरी पिकांच्या जोमदार वाढीसाठी दमदार पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने भातलागवड करण्यासाठी बहुतांश शेतकरी चांगल्या, दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, काही शेतकरी मात्र भातलागवडीची तयारी करीत असल्याचे दिसत होते. पाऊस पडत असतानाही काहींनी विहिरीचे पाणी खाचरात सोडून दिले होते. शिरगावसह पवन मावळात पावसाची जोरदार हजेरीशिरगाव : गेली अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने शिरगावसह पवन मावळात जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. शिरगाव, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, कासारसाई, सोमाटणे, परंदवडी, चांदखेड परिसरात पावसास सुरुवात झाली. मागील काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसामुळे जमिनीवर माना टाकलेली पिके तजेलदार दिसू लागली आहेत. या पावसाचा फायदा भुईमूग, भात, सोयाबीन, चवळी, मूग, घेवडा आदी पिकांसह उसालादेखील होणार आहे. काही ठिकाणी पावसाअभावी रखडलेल्या पेरणीच्या कामाला पावसामुळे पुन्हा वेग येणार आहे. भातरोपांनाही पावसामुळे जीवनदान मिळाले असून, लागवडीसाठीपोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भातलागवड करण्यास सुरुवात केली आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाली असल्याने दुबार पेरणीचा प्रश्न सुटला असल्याचे मत शिरगाव येथील भानुदास गोपाळे यांनी सांगितले.(वार्ताहर)