शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा सप्ताहाची वाट

By admin | Updated: January 10, 2017 02:56 IST

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने २८ वा रस्ते सुरक्षा सप्ताहाची घोषणा करण्यात आली. आजपासून या

पिंपरी : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने २८ वा रस्ते सुरक्षा सप्ताहाची घोषणा करण्यात आली. आजपासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे. येथील भर रस्त्यात पडलेले बॅरिकेट, जागृतीफलक पाहून मात्र शहरात या सप्ताहाची पहिल्याच दिवशी ‘ऐशी की तैशी’ झाल्याचे पाहायला मिळाले. वाहतूककोंडी, वाढते अपघात यांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनच्या वतीने ९ ते १५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सकाळी काही काळ वाहतूक पोलिसांकडून सिग्नलला उत्तम वाहतूक नियमन केले जात होते. मात्र पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दुपारच्या वेळी वाहतूक नियमनासाठी वापरण्यात येणारे बॅरिकेट भर चौकात अस्ताव्यस्तपणे पडले होते.तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियम व सुरक्षेविषयी जनजागृती करणारा फलकदेखील तुटलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे वाहनचालकांचा या चौकात  गोंधळ उडत होता. सुरक्षा  सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी  वाहतूक पोलिसांच्या साहित्याची ही अवस्था पाहून वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.  तसेच रस्त्यावर पडलेल्या बॅरिकेटमुळे अनेक दुचाकीचालक गडबडले. अनेक वेळ हे साहित्य रस्त्यावरच पडून होते. एरवी रस्ता सुरक्षा सप्ताह आला की, सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागते; पण यंदा हा सप्ताह सुरू असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी वाट लावण्यात आली, अशी टीका परिसरातील नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.(प्रतिनिधी)केवळ सप्ताहावेळीच तत्परता  आज सकाळपासून निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात सुमारे चार ते पाच वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन केले जात होते. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने थांबविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे आज येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे जात होते. मात्र केवळ मंत्री आल्यानंतर किंवा वाहतूक सप्ताहावेळीच वाहतूक पोलिसांकडून इतके तंतोतंत वाहतुकीचे नियमन केले जाते.  इतर वेळी मात्र केवळ वाहनांवर कारवाई करण्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे वाहनचालकांना झेब्रा क्रॉसिंग काय प्रकार आहे, हे देखील लक्षात राहत नाही व वाहतुकीचे तीन-तेरा वाजतात. त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहात या तत्परतेने वाहतुकीचे नियमन केले जाते. ते वर्षभर काय राहावे, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.