शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खोदाईची कामे संथगतीने

By admin | Updated: May 9, 2017 03:42 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कआळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने काँक्रिटीकरण करण्याची कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने अलंकापुरीत वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. अवघ्या सव्वा महिन्यावर आषाढी पायी वारी येऊन ठेपल्याने महिन्याच्या कालावधीत ही कामे पूर्णत्वास येतात की नाही, हाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून शहराला जोडणाऱ्या वडगाव, मरकळ, चाकण, केळगाव, भोसरी आदी रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यांचे नव्याने मजबुतीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिक सुमारे तीन वर्षांपासून प्रशासनाकडे करत होते. अखेर या वर्षी प्रशासनाने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे हाती घेऊन काँक्रिटीकरणास सुरुवात केली आहेत. त्यामुळे नागरिकांची तसेच भाविकांची अनेक वर्षांपासूनची रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा पूर्ण होत आहे. चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाकडून वडगावमार्गे चऱ्होली खुर्द हद्दीतून शहराला जोडणाऱ्या दीड किमी अंतराच्या दुहेरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तर चाकण बाजूकडून केळगावमार्गे सुरू असलेले काम गेल्या आठ दिवसांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. त्यातच मरकळ बाजूने शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेतल्याने मागील अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांना दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील बहुतांशी सर्वच रस्त्यांची खोदाई करून कामे संथ गतीने सुरू आहेत. परिणामी प्रवासादरम्यान वाहनांना अडथळा निर्माण होऊन विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.