शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील अपघात टळणार, रोड दुरुस्तीमुळे वाहनचालकांमधून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:21 IST

कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळा दरम्यान केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या (सीओडी) प्रवेशद्वारापर्यंतचा

देहूरोड : लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोली ते झेंडेमळा दरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण दूर करण्याबाबत प्रशासन ढिम्म होते. गेल्या सहा महिन्यांत स्थानिक नागरिक, लष्करी जवान, अधिकारी, तळवडे आयटी पार्कमधील अभियंते व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत लोकमतने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर लष्करी अभियंता कार्यालयाकडून शुक्रवारी दुपारनंतर रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळा दरम्यान केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या (सीओडी) प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता देहूरोड लष्करी अभियांत्रिकी विभागाच्या (एमईएस) ताब्यात असून, त्यांच्यामार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर विविध ठिकाणी धोकादायक खड्डे पडले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत लोकमतने ‘प्रशासनाला सद्बुद्धी दे’ या शीर्षकाने छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या रस्त्यावर चिंचोलीतील शनिमंदिर ते आर्मी स्कूल दरम्यानच्या एक किलोमीटर भागात दोनशेहून अधिक खड्डे पडले होते.

मावळ तालुक्यातही अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.वाहनचालकांमधून समाधानकॅन्टोन्मेंट बोर्डाकडे नागरिकांनी तक्रार केली होती. त्यातच या रस्त्यावर अंधार असल्याने वाहनचालकांना नाइलाजास्तव खड्ड्यात वाहन घालावे लागत होते. वारंवार अपघात होत होते. याची दखल घेत लष्करी प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती सुरू केली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षा