शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वाहनांमुळे ४९ कोटींचा महसूल

By admin | Updated: November 6, 2016 04:21 IST

उद्योगनगरीत दिवाळीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी सुमारे १२ हजार दुचाकी, तीन हजार चारचाकी, खासगी बस, ट्रक, रिक्षा, टँकर मिळून सुमारे १६ हजार वाहनांची खरेदी केली आहे़

पिंपरी : उद्योगनगरीत दिवाळीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी सुमारे १२ हजार दुचाकी, तीन हजार चारचाकी, खासगी बस, ट्रक, रिक्षा, टँकर मिळून सुमारे १६ हजार वाहनांची खरेदी केली आहे़ वाहनांच्या खरेदीमुळे उपप्रादेशिक कार्यालयाला ‘वन टाइम टॅक्स’च्या माध्यमातून ३९ कोटींचा महसूल मिळाला आहे. इतर कर मिळून ४९ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे़दसरा ते दिवाळीचा मुहूर्त साधत उद्योगनगरीतील अनेकांनी दुचाकीच्या खरेदीला प्राधान्य दिले़ राज्यातील सर्वाधिक दुचाकींचे उत्पादक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. दिवाळीच्या काळात श्रमीक नगरीत कोट्यवधीच्या बोनसचे वाटप होते. या काळात उत्पादक कंपन्यांकडून कामगार व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीवर सवलतीची योजना आणली जाते. मुहूर्तावर खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे दस-यापासून नवीन वाहन खरेदी सुरू झाली होती. नागरिकांनी नवीन वाहने खरेदी केली. त्यामुळे महिन्याभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तुलनेत जादा महसूल जमा झाला आहे़ १ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान या सर्व वाहनांची नोंद परिवहन कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे शासनाकडे महसूल जमा आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली़(प्रतिनिधी)रहदारीचा प्रश्नशहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम नाही. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी श्रमिकांना कसरत करावी लागते. त्यामुळे स्वत:चे वाहन खरेदी करण्यासाकडे कल वाढला आहे़ दरवर्षी शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. यंदा नव्याने सुमारे १६ हजार वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याबरोबच प्रदुषणातही वाढ होत आहे.