शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडे पाठविला ‘रिंग’चा अहवाल; ४२५ कोटींच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:21 IST

महापालिकेतील ४२५कोटींच्या रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत याबाबतची माहिती महापालिकेने शासनाकडे पाठवावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

पिंपरी : महापालिकेतील ४२५कोटींच्या रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत याबाबतची माहिती महापालिकेने शासनाकडे पाठवावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रधान सचिवांना महापालिकेने ४२५ कोटींच्या कामाच्या मंजुरीबाबतची माहिती नुकतीच पाठविली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व ठेकेदारांनी ४२५ कोटींच्या रस्त्याच्या कामात रिंग करून मोठा भ्रष्टाचार केला आहे. जादा दराच्या निविदा मंजुरीमुळे महापालिकेचे सुमारे ९० कोटींचे नुकसान झाले आहे. करदात्यांच्या निधीची ९० कोटींची संगनमताने लूट करण्यात आली आहे़ त्यात महापालिका आयुक्तांचाही सहभाग असल्याचा आरोप, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सल्लागार नेमणूक प्रकरणीसुद्धा उचित कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिल्या आहेत.रस्ते विकासाच्या ४२५ कोटींच्या कामातील गैरव्यहारामुळे सत्ताधारी भाजपावर आरोप होत आहेत. यामुळे पक्षाची बदनामी होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा खासदार अमर साबळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. महापालिकेने ४२५ कोटींच्या कामाच्या मंजुरीबाबतची माहिती नुकतीच राज्य सरकारला पाठविली आहे.या आरोपांची झाली चौकशीरस्ते विकास कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत, मागील आठ महिन्यांत मंजुरी दिलेल्या टीडीआर वाटपाची, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ईडब्ल्यूएस योजनेतील घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली होती. महापालिकेने मागील आठ महिन्यांत तब्बल ४१ लाख २७ हजार चौरस फुटांचे हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) वाटप केले आहे. त्याची किंमत ५३०० कोटी असून यामध्ये आयुक्त व भाजपाचे पदाधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस योजनेतील घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली होती. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरव्यहाराबात कारवाई करण्याच्या सूचना प्रधान सचिवांना दिल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड