शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

स्मार्ट सिटीचा अडथळा दूर

By admin | Updated: July 21, 2015 03:43 IST

स्मार्ट सिटी योजनेत महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेत महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यामुळे या स्पर्धेत सहभाग घेण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील नागरिकांना वैयक्तिक व सामूहिक शौचालय उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारबरोबरच महापालिकेचे अनुदानही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर शकुंतला धराडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होईल की नाही, याबाबत आयुक्त राजीव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शंका व्यक्त केली होती. मात्र ‘स्मार्ट सिटी’त सहभागी व्हायचे किंवा नाही, हे सर्वस्वी महापालिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपली सक्षम बाजू मांडत स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत उतरण्याचे निश्चित केले आहे. या योजनेत सहभागी होणे हे शहराच्या दृष्टीने हितावह असल्याने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची जोरदार तयारी प्रशासनाने केली आहे. स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला विनाचर्चा सभागृहात मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या वाटचालीतील पहिला अडथळा पार पडला आहे.विद्यार्थ्यांना भरावी लागणार बसपाससाठी २५ टक्के रक्कममहापालिका हद्दीतील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पीएमपीच्या मोफत बसपाससाठी आता २५ टक्के रक्कम मोजावी लागणार आहे. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी बसपासपोटी २५ टक्के रक्कम महापालिका कोषागारात भरल्यानंतर त्यांना पीएमपीकडून विद्यार्थी पास दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला.पुणे महापालिकेनेही विद्यार्थी मोफत बसपास योजना राबविली आहे. तथापि ती बंद करून सुधारित बसपास योजना लागू केली आहे. त्यानुसार महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत, तर खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के रक्कम भरून बसपास देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या या निर्णयाची राष्ट्रवादी काँग्रेसने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांकडून २५ टक्के रक्कम वसूल केल्यास महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही. खासगी पासधारक विद्यार्थ्यांची निश्चित संख्या उपलब्ध होईल, दुबार - बोगस पास प्रकार भविष्यात उद्भवणार नाहीत, अशी तकलादू कारणेही राष्ट्रवादीने पुढे केली आहेत.त्याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)