शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित बांधकामे नियमित करा

By admin | Updated: March 9, 2016 00:34 IST

अनियमित बांधकामे नियमित होण्याबाबत आगामी अधिवेशनात नवा कायदा मंजूर करावा, अशी मागणी स्वराज अभियानचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर यांनी केली आहे.

पिंपरी : अनियमित बांधकामे नियमित होण्याबाबत आगामी अधिवेशनात नवा कायदा मंजूर करावा, अशी मागणी स्वराज अभियानचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेने बांधकामे नियमित करण्याची आश्वासने दिली. मात्र वर्ष उलटले, तरी हा प्रश्न ‘जैसे थे’ असल्याचेही म्हटले आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भापकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे सरकार या प्रश्नाबाबत निर्णय घेत नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरात सर्वपक्षीय आंदोलन झाले, त्या वेळी विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आणा. तुमचा हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. परंतु, सत्तेवर येऊन वर्ष उलटले, तरी प्रश्न ‘जैसे थे’ आहे. हा प्रश्न तत्काल निकाली काढून जनतेला दिलासा देणारा निर्णय होईल, अशी अपेक्षा असताना हा प्रश्न प्रलंबित ठेवला जात आहे. यामध्ये सन २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या मतांचे राजकारण दडले असल्याचे दिसते. भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शहरात अनियमित बांधकामांबाबत नोटिसा बजावणे, प्रत्यक्ष बांधकामांवर कारवाई करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, मिळकतधारकांना दुप्पट शास्तीकर आकारणे यांमुळे या शहरातील नागरिक हवालदिल झालेले आहेत. तरी सीताराम कुंटे समितीचा अहवाल, महसूल विभागाचा अहवाल व इतर सर्व तांत्रिक बाबींचा पाठपुरावा करून हे अहवाल उच्च न्यायालयासमोर ठेवावे, तसेच अनियमित बांधकामे नियमित होण्याबाबत नवा कायदा आगामी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तत्पूर्वी महापालिका सभेमध्ये उल्हासनगर महापालिका अधिनियम २००६, गुंठेवारी अधिनियम २००१, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ कलम १४३ व विकास आराखड्यातील आरक्षणाच्या जागेतील बाधित मिळकतधारकांची पर्यायी व्यवस्था, पुनर्वसन व्हावे, अशा आशयाचे प्रस्ताव या समितीसमोर आम्ही ठेवले, तसेच या शहरातील एम.आय.डी.सी. प्राधिकरण, पिं चिं. नवनगर प्राधिकरण व रेड झोन हद्दीतील बांधकामांबाबतीतील काही सूचना आम्ही समितीकडे केल्या होत्या. या समितीने ग्रामीण आणि शहरी भागातील बांधकामाबाबत एक धोरण तयार करावे, त्यानुसार अशा अनियमित बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत एक सर्वंकष, असा कायदा तयार व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु, याबाबत राजकीय हेतूने प्रेरित होऊन इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे काम रखडलेले आहे. (प्रतिनिधी)