शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी नित्याचीच

By admin | Updated: June 28, 2017 04:09 IST

तापकीर चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा चौकात वाहतूकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : तापकीर चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा चौकात वाहतूकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. या चौकात सकाळच्या वेळेत उभे राहणाऱ्या मजूरांना जीव मुठीत घेऊन थांबावे लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून राहटणी फाटा येथे मजूर अड्डा अस्तित्वात आहे. या अड्डयावर शेकडो नागरिक मजूरीच्या प्रतिक्षेत उभे असतात. मात्र या मजूरांना उभे राहण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध नसल्याने मुख्य चौकातच रस्त्याच्या बाजूला उभे राहावे लागते. त्यामुळे, काळेवाडीकडून काळेवाडी फाटा व राहाटणी गावाकडे जाणाऱ्या रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. याच चौकात टेम्पो, ट्रक, बस, सहा आसणी रिक्षा आणि तीन आसणी रिक्षांनी अघोषित थांबा केल्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मजूरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काळेवाडी फाटा ते एमएम विद्यालय या दुतर्फी मार्गावर मोठ्या प्रमाणात बस, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, उभे केले असल्याने व त्याच समांतर रांगेत हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले व छोटे व्यावसायिक उभे राहात असल्याने वाहन चालकांना तीन पदरी रस्ता असूनही एका रांगेचाच उपयोग रहदारीसाठी करावा लागत आहे. त्यामुळे, तापकीर चौक, धनगरबाबा मंदीर चौक व रहाटणी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. काळेवाडी फाटा ते एमएम विद्यालय या बीआरटीएस मार्गिकेमधील अनधिकृतपणे पार्कींग केलेली वाहने काढून हा रस्ता वाहतूकीसाठी खुला करावा. हा रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडीस आळा बसून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.