शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्ष बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:00 IST

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी केशव घोळवे, सचिन चिंचवडे, अश्विनी जाधव, शशिकांत कदम, भीमाबाई फुगे, साधना मळेकर, अभिषेक बारणे आणि अंबरनाथ कांबळे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.

पिंपरी : महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी केशव घोळवे, सचिन चिंचवडे, अश्विनी जाधव, शशिकांत कदम, भीमाबाई फुगे, साधना मळेकर, अभिषेक बारणे आणि अंबरनाथ कांबळे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यातील सातजण हे भाजपाचे नगरसेवक असून, एका क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी साधना मळेकर या भाजपाशी संलग्न अपक्ष नगरसेविकेची निवड झाली.पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व प्रशासकीय कामकाजाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने भाजपने नवीन दोन क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे पूर्वीचे सहा व नवीन दोन अशा आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षांची निवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात झाली. विरोधी पक्षांनी एकही अर्ज दाखल केलेला नव्हता. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या जागा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. भूजल संचालनालयाचे संचालक शेखर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर अध्यक्षांच्या निवडीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. सायंकाळी सहावाजेपर्यंत क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होती. त्यानंतरअध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.महापालिका कामकाजाचे विकेंद्रीकरण सध्या महापालिकेत अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे साडेसात हजार इतके मनुष्यबळ आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयावरील ताण कमी करण्याबरोबर नागरिकांच्या समस्या स्थानिक ठिकाणी सोडविण्यात याव्यात, या उद्देशाने आणखी दोन क्षेत्रीय कार्यालये तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे कामकाजाचे विकेंद्रीकरण होणार आहे. त्यानुसार मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण २८८५ अधिकारी व कर्मचारी देण्यात आले आहेत, असे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.