शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, एक कोटी दहा लाखांच्या खर्चाला दिली मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:27 IST

पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. याविषयी स्थायी समितीत यावर चर्चा झाली. जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे खड्डे बुजविण्यात येणार आहेत.

पिंपरी : पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. याविषयी स्थायी समितीत यावर चर्चा झाली. जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे खड्डे बुजविण्यात येणार आहेत. शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामांसाठी १ कोटी १० लाख रुपयांचा खर्च येणार असून त्यासाठीच्या तरतूद वर्गीकरणाच्या आयुक्त प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मॉन्सूनपूर्व डागडुजी न केल्याने उद्योगनरीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच शनिवारपासून पावसाने जोर धरल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याविषयी दोन दिवसांपूर्वी लोकमतने ‘खड्डे दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष’ असे वृत्तही प्रकाशित केले होते.खड्ड्यांच्या विषयावर स्थायी समितीत चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. यापूर्वी प्रशासनाने खड्डे बुजविण्याचा निर्णय ८ आॅगस्ट १७ च्या बैठकीत घेण्यात आला. तथापि, हे खड्डे जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे भरावेत असे ठरले. त्यानुसार आजच्या स्थायी समिती सभेत इ प्रभागातील खड्डे मशिनद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आयुक्तांनी खड्डे बुजविण्यासाठी सर्व प्रभागातून प्रत्येकी वीस लाख वर्गीकरणाचा विषय समिती समोर ठेवला होता. त्यास मंजुरी दिली.याविषयी सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्याविषयी चर्चा झाली. प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याची माहिती घेतली. त्या वेळी आयुक्तांनी आधुनिक पद्धतीद्वारे खड्डे बुजविण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.’’प्रशासन दखल घेत नसल्याची तक्रारशहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. सिमेंटचे रस्ते सोडले तर अंतर्गत भागातील रस्त्यांवर पावसामुळे जागोजागी खड्डे पडलेले आहेत. निगडीपर्यंतच्या सेवा रस्त्यांवरही खड्डे आहेत. ग्रेड सेपरेटरवरही काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रारी नागरिक करीत आहेत.