शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:57 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. त्यातील निवडणूक खर्चासाठी निवडणूक विभागाच्या लेखाशीर्षावर अपुरी तरतूद असल्याने तब्बल अडीच कोटींची बिले प्रलंबित होती.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. त्यातील निवडणूक खर्चासाठी निवडणूक विभागाच्या लेखाशीर्षावर अपुरी तरतूद असल्याने तब्बल अडीच कोटींची बिले प्रलंबित होती. त्यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात अखेरची शिल्लक असलेल्या ३२ कोटी ६७ लाखांतून निवडणूक विभागासाठी तरतूद वर्ग केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीसमोर ठेवलेला प्रस्ताव मागे घेत विशेषाधिकारात मंजूर केला आहे.महापालिका निवडणूक विभागाच्या निवडणूक खर्च या लेखाशीर्षावर अपुरी तरतूद आहे. भांडार विभागाच्या झेरॉक्स मशिन भाडे, अधिकारी, कर्मचारी चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी, व्हीडीओ शूटिंग, जनजागृती, निवडणूक विभागाचे प्रेक्षागृह भाडे, मानधन, फ्लेक्स बोर्ड, लेखा विभागाकडील मानधन आदी खर्चाकरिता २०१७-१८च्या अर्थसंकल्पातील अखेरच्या शिल्लक रकमेतून दोन कोटी ६० लाख रुपये निवडणूक खर्च या लेखाशीर्षावर वाढीव तरतूद वर्ग करावी, अशी मागणी निवडणूक विभागाच्या सहायक आयुक्तांनी नगरसचिव विभागाकडे केली आहे. निवडणूक विभागाच्या १०१७-१८ च्या अर्थसंकल्पात निवडणूक खर्च या लेखाशीर्षावर ८५ लाख रुपये तरतूद केली आहे. त्यापैकी ७६ लाख ९५ हजार रुपये खर्च झाला आहे. आठ लाख रुपये इतकी तरतूद सध्या शिल्लक आहे. ती मार्च २०१८ अखेर अपुरी आहे. या व्यतिरिक्त निवडणूक खर्चाकरिता बिले प्रलंबित आहेत.>स्थायीचा प्रस्ताव मागेभांडार विभागातर्फे झेरॉक्स मशिन भाडे, अधिकारी, कर्मचारी चहा, नाष्टा, जेवण, पिण्याचे पाणी, व्हीडिओ शूटिंग, जनजागृती या कामांपोटी १ कोटी ६९ लाख ३५ हजार रुपये बिले प्रलंबित आहेत. निवडणूक विभाग व मुख्य कार्यालयातर्फे प्रेक्षागृह भाडे, मानधन, फ्लेक्स बोर्ड, भविष्यातील पोटनिवडणुकीसाठी ४३ लाख ८७ हजार रुपये, माहिती व जनसंपर्कविभागातर्फे मतदार जागृती कार्यक्रम, लेखा विभागातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचाºयांच्या मानधनाचे २२ लाख रुपये असे एकूण दोन कोटी ६० लाखांची बिले प्रलंबित आहेत.निवडणूक विभागाकडे निवडणूक खर्च या लेखाशीर्षावर तरतूद शिल्लक नाही. ही अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. तथापि, तो मागे घेतला असून, आयुक्तांच्या विशेषाधिकारात तो मंजूर केला आहे.