शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईत तत्पर, नियोजनात मात्र मागे

By admin | Updated: February 5, 2016 01:47 IST

वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करीत फक्त दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. चिंचवड परिसरात सध्या वाहतूक शाखेचे कर्मचारी

चिंचवड : वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करीत फक्त दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. चिंचवड परिसरात सध्या वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहन तपासणी करण्यात व्यस्त आहेत. या प्रकाराबाबत नागरिक हैराण झाले आहेत. दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था ही सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांची लूट होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.परिसरात सुरू असलेली अवैध वाहतूक, रस्त्यावर उभी असलेली व्यावसायिक वाहने, सम-विषम पार्किंग व्यवस्था असूनही मनमानी पद्धतीने उभी असणारी वाहने, अवजड वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची होणारी वाहतूक व त्रासदायक ठरत असलेली वाहतूककोंडी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहन तपासणीसाठी तत्पर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाहतूक शाखेच्या या कारवाईबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावर वाहनचालकांची होणारी अडवणूक बंद झाली. मात्र, चिंचवड परिसरातील वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर, चापेकर चौकातून तानाजीनगरकडे जाणारा रस्ता, शहीद अशोक कामठे बसस्थानक परिसर, काळेवाडीकडे जाणारा रस्ता व अहिंसा चौक या भागात नियमित कारवाई सुरू आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनचालकांना तपासणीसाठी थांबवितात. वाहन परवाना, पीयूसी,हेल्मेट, वाहनाचे कागदपत्रे अशा विविध तपासण्या केल्या जातात. दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या दंडाची कारवाई केली जाते. (वार्ताहर) वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनचालकांना दंडात्मक करवाईसाठी आग्रह धरतात. आमचे टार्गेट पूर्ण करावे लागते हे सांगत असतात. मात्र हे टार्गेट म्हणजे काय आहे हे न उलगडणारे कोडे आहे. हे टार्गेट पोलिसांना कोण देत आहे व किती टार्गेट आहे, हे मात्र समजत नाही. काही वाहतूक पोलीस याबाबत वरिष्ठांनी सांगितले असल्याचे सांगत आहेत. मात्र हे वरिष्ठ कोण आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे.