शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामा बिल्डर्सला दोन लाखांचा दंड

By admin | Updated: April 10, 2016 03:59 IST

स्वीस कौंटी या थेरगाव येथील गृहप्रकल्पात बिल्डरने माहितीपुस्तकात नमूद केल्यानुसार सुविधांची पूर्तता केली नाही. या प्रकरणी गृहप्रकल्पात सदनिका घेतलेल्या सभासदांनी पुणे जिल्हा

पिंपरी : स्वीस कौंटी या थेरगाव येथील गृहप्रकल्पात बिल्डरने माहितीपुस्तकात नमूद केल्यानुसार सुविधांची पूर्तता केली नाही. या प्रकरणी गृहप्रकल्पात सदनिका घेतलेल्या सभासदांनी पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या सुनावणीत रामा बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांनी तक्रारदार सभासदांना दंड व भरपाई म्हणून दोन लाख रुपये द्यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे. स्वीस कौंटी या इमारतीत बिल्डरने ग्राहकांना दिलेल्या माहितीपुस्तिकेनुसार, तसेच करारात नमूद केल्यानुसार सुविधांची पूर्तता केली नाही, या कारणास्तव रवी सोनी, दीपक लखनलाल सिंघल, राकेश वशिष्ठ यांनी रामा बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे मोती पंजाबी, राजू पंजाबी, जितू पंजाबी, नरेश पंजाबी या संचालकांविरोधात पुणे ग्राहक मंचात अर्ज दाखल केला होता. करारानुसार सदनिकाधारकांना सोयी, सुविधा पुरविल्या नसल्याने गैरसोय होत असल्याचे तक्रारदारांनी अर्जात नमूद केले होते. तक्रारदार ग्राहकांनी अडीच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. न्याय मंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख, सदस्य एस. के. पाचरणे यांनी या प्रकरणी निकाल दिला आहे. त्यामध्ये सुविधांची पूर्तता केली नाही म्हणून तीन तक्रारदारांना रामा बिल्डर्सच्या संचालकांनी एकत्रित दोन लाख रुपये भरपाई म्हणून द्यावेत. लिफ्टला बॅटरी बॅकअप द्यावे, तक्रारीचा खर्च म्हणून तक्रारदारांना पाच हजार रुपये द्यावेत. निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून सहा आठवड्यांत आदेशाची पूर्तता करावी. अन्यथा दर दिवशी २०० रुपयेप्रमाणे सोसायटीस दंड द्यावा लागेल, असे निकालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)