शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

रक्षाबंधन-दृष्टी परिवर्तनाचा सण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:40 IST

एकनाथ पवार : महापालिकेच्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग

पिंपरी : भारतीय संस्कृती ही पवित्र दृष्टीने आणि आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण असल्याचे मत महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले. बहीण-भावाच्या स्नेहबंधनाचे पवित्र नाते जपणारा रक्षबंधन सगळीकडे साजरा होतो आहे. याच रक्षाबंधनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता महिला कर्मचारी यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना स्वच्छता महिला कर्मचाºयांनी राखी बांधून दीर्घ आयुष्य आणि सुख लाभो म्हणून प्रार्थना केली.

पूर्णानगर येथील पक्षनेते पवार यांच्या संपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या स्वच्छता कर्मचाºयांना रक्षाबंधननिमित्त भेट देण्यात आली. या वेळी भाजपा महिला शहर उपाध्यक्ष अश्विनी शिंदे, योगिता केदारी, वैशाली खामकर, सोनू भालेराव, विजय घोडके, नीलेश सुंभे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाल, ‘‘केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. समाजात केवळ स्त्रियांचे भाऊ म्हणून रक्षण करणे पुरेसे नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या घडीला समाजात स्त्री-पुरुष समानता मानणे, स्त्रीचा आदर करणे तसेच सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती होणे गरजेचे आहे.’’थेरगाव येथे पीएमपी, एसटी बसला राखीवाकड : येथील थेरगाव सोशल फाउंडेशनतर्फे एसटी व पीएमपी बसला राखी बांधून तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. समाजात कधी तेढ निर्माण होते, दंगली होतात तेव्हा या बसला लक्ष्य केले जाते. अशा वेळेस बसचे मोठे नुकसान होते. त्यामुळे टीएसएफने अनोखे पाऊल उचलत तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची शपथ घेतली. डांगे चौकात हे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaksha Bandhanरक्षाबंधन