शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भात उत्पादनात १० टक्के वाढ, हेक्टरी ४० ते ४५ क्विंटलचे उत्पन्न, ९५ टक्के भात कापण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:49 IST

कामशेत : भातपिकाचे आगर समजल्या जाणा-या मावळ तालुक्यातील खरिपातील भातपिकाच्या कापण्या ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत.

कामशेत : भातपिकाचे आगर समजल्या जाणा-या मावळ तालुक्यातील खरिपातील भातपिकाच्या कापण्या ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. या वर्षी मुबलक व समाधानकारक, तसेच भात पिकाला पूरक पाऊस पडला असल्याने पिकाची जोमात वाढ झाली होती. गतवर्षीपेक्षा मावळातील शेतकºयांना भाताचे सुमारे दहा टक्के जास्त उत्पादन अधिक मिळणार असल्याचा कृषी अधिकाºयांचा अंदाज आहे.मावळ तालुक्यात भात पिकाचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. येथील पर्जन्यमान भात पिकास पोषक असल्याने, तसेच या वर्षीच्या पावसाने योग्य वेळी व संततधार हजेरी लावल्याने भातपिकाचे उत्पादन उत्तम झाले, असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विनायक कोथंबिरे यांनी दिली. या वर्षी पावसाने सुरुवातीला काही प्रमाणात ओढ देऊन उशिराने सुरुवात केली. मात्र, नंतर मुबलक पडलेल्या पावसामुळे भात पिकाच्या उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही ठिकाणी परतीच्या पावसाने उभ्या भात पिकाला दणका बसला होता. जुलै महिन्यापासून वेळोवेळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने भातपीक तरारून उभे राहिले. वाढीच्या काळात अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले होते. खाचरांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक भागात शेतकºयांना भातकापणी करणे अवघड झाले होते. कापणी करून सर्व भात कोरड्या जागेत ठेवावे लागत होते. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी भातकापणीला सुरुवात झाली.शेतमजुरांचा तुटवडाएकाच वेळी अनेकांची भात कापणी आल्याने शेतमजुरांचा मोठा तुटवडा जाणवला. या दिवसांत शेतमजुरांची बडदास्त राखण्यात अनेक भातपीक उत्पादक शेतकरी गुंतले होते. तर अनेकांनी घरातील मंडळींच्या साहाय्याने भात कापणी उरकली.>तालुक्यात सुमारे ९७०० हेक्टर क्षेत्र भात पिकाचे असून, या वर्षी सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षीचे भात पिकाचे उत्पादन प्रति हेक्टर ३६ क्विंटल झाले होते. या वर्षी सुमारे ४० ते ४५ क्विंटल भातपिकाचे प्रति हेक्टर उत्पादन झाले.- विनायक कोथंबिरे, तालुका कृषी अधिकारी, मावळ