शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

रेन हार्वेस्टिंगमध्ये ‘इंद्रधनु’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:02 IST

जाधववाडी-चिखली परिसरात लिंकरोडवर नव्यानेच तयार झालेल्या सोसायट्यांपैकी एक सोसायटी म्हणजे व्हीजन इंद्रधनु. अल्पावधीतच या परिसरात इंद्रधनु सोसायटीने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे

जाधववाडी : जाधववाडी-चिखली परिसरात लिंकरोडवर नव्यानेच तयार झालेल्या सोसायट्यांपैकी एक सोसायटी म्हणजे व्हीजन इंद्रधनु. अल्पावधीतच या परिसरात इंद्रधनु सोसायटीने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. या सोसायटीमधे सर्व सुक्षिशित नोकरदारवर्ग राहतो. इंद्रधनु सोसायटीमध्ये तीन विंग असून, १९२ फ्लॅट आहेत. संपूर्ण सोसायटीमध्ये १३ सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून देखरेख केली जाते.सोसायटीमध्ये आम्ही एकत्र कुटुंबासारखे राहत असून, सर्व उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतो. महापुरुषांची जयंती असो, गणेशोत्सव असो, गोपाळकाला असो, होळी असो, दिवाळी-दसरा असे सर्वच उत्सव साजरे केले जातात. संगीत खुर्ची, अंताक्षरी, फॅन्सी ड्रेस, चित्रकला स्पर्धा, महिला व पुरुष मिळून साजरा करतात. नवरात्र, दहीहंडी, दसरा, तुळशीचे लग्न, १५ आॅगस्ट, २६ जानेवारीनिमित्त प्रभातफेरी, कोजागरी, नववर्षाचे स्वागत, बालदिनी बच्चे कंपनीसाठी उंट, घोडे यांची सफर, जादूचे खेळ, ज्येष्ठ नागरिकांची सहल, सोसायटीत बसण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून सोय केलेली आहे.आदर्श उपक्रमएक आदर्श उपक्रम म्हणजे सभासदांचे वाढदिवस एकत्र येऊन साजरे केले जातात. ज्या सभासदांचा वाढदिवस असेल त्यांनी स्वत:हून सोसायटीसाठी खुर्ची सप्रेम भेट द्यायचा नियम आहे. संपूर्ण सोसायटी कमिटीचे उद्दिष्ट आहे, की दर वर्षी पाच लाखांची बचत करायची आणि पाच वर्षांनी जमा झालेली साठ लाख रक्कम बॅँकेत फिक्स स्वरूपात ठेवून आलेल्या व्याजावर संपूर्ण सोसायटी चालवली जाईल.कामे दिली वाटूनसोसायटीचा मेंटेनन्स विनाखर्च असेल आणि सोसायटीच्या नावावर पहिल्या पाच वर्षांमध्ये साठ लाख व पुढील पाच वर्षांनी १ कोटी २० लाख ठेव स्वरूपात जमा असतील. कमिटीत तीन विंगमधून १५ सदस्य आहेत. प्रत्येकी तीन-तीन जणांचा ग्रुप करून पाणी, अंतर्गत ड्रेनेज, एसटीपी, रेन वॉटर हार्वेस्ंिटग, सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, गार्डन, क्लब हाऊस, फायर स्टेशन, जीम, लायब्ररी व कॉमन अ‍ॅमेनेटीज अशी कामे वाटून घेतली आहेत.समस्या सुटणार कधी?सोसायटीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करूनच दिला जातो. सध्या आम्हाला वेळेवर कचरा न उचलण्याने दुर्गंधी, डासांचा जास्त उपद्रव जाणवतो. तसेच रिक्षा स्टॅण्ड व बसची सोय उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून येणाºया-जाणाºयांना अधिक त्रास होत आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सोसायटीबाहेरील पालिकेचा रस्ता अरुंद असल्यामुळे व सर्व बाजार येथेच आहे.सोसायटीमध्ये पालिकेच्या व स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून सोसायटीच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात सोसायटीतील पार्किंगमधील झाडे हे पार्किंगधारकांना संगोपनासाठी दत्तक म्हणून विचाराधीन आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर व सोसायटीला आयएसओ मानांकन मिळवून द्यायचे उद्दिष्ट आहे.- रवींद्र जांभूळकर, चेअरमन