शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उपसूचनांचा पडणार पाऊस; सर्वसाधारण सभेत आज होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:00 IST

महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत चर्चा होणार की नाही याबाबत उत्सुकता असताना विकासकामे घुसडविण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अनेक उपसूचना दिल्या आहेत.

पिंपरी : महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत चर्चा होणार की नाही याबाबत उत्सुकता असताना विकासकामे घुसडविण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अनेक उपसूचना दिल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या उपसूचनांचा पाऊस पडला असून, उपसूचना स्वीकारणार की नाही, याविषयी उत्सुकता आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. तसेच, अवघ्या दोन तासांतच अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा सभापती सीमा सावळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प ५२६२ कोटी ३० लाखांवर पोहोचला आहे.महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पास त्याच दिवशी मंजुरी देत सीमा सावळे यांनी विक्रम केला. अर्थसंकल्पावरील सभा दोनदा तहकूब केली आहे. तिसरी सभा मंगळवारी होणार आहे. भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होऊ न देता अवघ्या १० मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर केला होता. ही परंपरा कायम ठेवणार, की सदस्यांना त्यावर बोलू देणार, या विषयी महापालिका वर्तुळात उत्सुकता आहे. उद्याच्या सभेत सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर निर्णयअर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली सभा दोनदा तहकूब केली होती. त्यानंतर उद्या दुपारी दोनला सभा होणार आहे. अर्थसंकल्पास मंजुरी देताना सत्ताधारी भाजपा उपसूचनांचा स्वीकार करणार किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातील सदस्यांनी आपापल्या भागातील विषयांच्या उपसूचना दिल्या आहेत. कामांच्या तरतुदीसाठी टोकन हेड निर्माण करावे, अशीही मागणी केली आहे. त्यामुळे उपसूचना घ्यायच्या किंवा नाहीत, यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या उपसूचना आल्या आहेत. त्यांपैकी कोणत्या स्वीकारायच्या याबाबत शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि खासदार अमर साबळे यांच्याशी चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड