शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गेट ओलांडणे जोखमीचे

By admin | Updated: May 5, 2017 02:33 IST

नाणे रोडवर असलेले रेल्वे गेट आणि वडिवळे येथील संगिसे रेल्वे गेटचा अंतर्गत (रुळाजवळील) रस्ता अत्यंत खराब अवस्थेत

कामशेत : येथील नाणे रोडवर असलेले रेल्वे गेट आणि वडिवळे येथील संगिसे रेल्वे गेटचा अंतर्गत (रुळाजवळील) रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी व चारचाकी चालकांना त्रास होत आहे. या रस्त्यावरील ब्लॉक उखडले गेले असल्याने दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटी बस व नाणे मावळात असणाऱ्या शाळांच्या बस या रस्त्यावर अडकून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाणे मावळात जाण्यासाठी कामशेतमधून नाणे रोड आहे. या रस्त्याच्या काही अंतरावर रेल्वे प्रशासनाचे गेट नं. ४३ - ए आहे. या गेटमध्ये रेल्वे रूळ रस्त्यावर रेल्वेकडून काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीनिमित्त गेटवरील पेव्हर ब्लॉक खोदण्यात आले होते; परंतु काम झाल्यानंतर ते व्यवस्थित बसवण्यात आले नाहीत. रेल्वेच्या गाड्या जाऊन बसणाऱ्या हादऱ्यामुळे हे ब्लॉक एकमेकांपासून दूर जाऊन मोठे खड्डे तयार झाले आहेत. हे ब्लॉक जागोजागी उखडले असून अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्यावर दुचाकीचालक कमी गती व खड्डा यामुळे पडत आहेत. मागून येणाऱ्या वाहनाचा त्यांना धक्का लागून अपघात होत आहे. हा रस्ता खराब असल्याने ठरावीक वेळी मोठी वाहतूककोंडी होत असून रेल्वे गेट बंद करण्याच्या वेळेपर्यंतही ती सुटत नाही.हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा यासाठी छत्रपती नेटवर्क मावळ या युवकांच्या संघटनेने रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले असून, जर दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)नाणे मावळात जाण्यासाठी दोन रेल्वे गेट ओलांडावे लागत असून येथे नाणे, कांब्रे, करंजगाव, गोवित्री, वळवती, वडवली, कोळवाडी, भाजगाव, सुमवडी, शिरदे, थोरण, जांभवली, साबळेवाडी, ब्राह्मणवाडी, कचरेवाडी, वाऊड, घोणशेत, कोंडीवडे, वळवंती, मोरमारवाडी, पाले, करंजगाव, उकसान, माऊ, साई, पारवडी, नाणोली, उंबरवाडी, वडीवळे, सांगिसे, बुधवडी, वळकं, खांडशी, नेसावे, आदी प्रमुख गावे व अनेक वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना रोज या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पण, रेल्वेमार्ग ओलांडताना रस्त्याची दुरवस्था असल्याने अपघात होत आहेत.