शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

राहुल जाधव यांचा ‘स्थायी’चा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपात धुसफूस सुरू आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपात धुसफूस सुरू आहे. स्थायी समिती सभापतिपदात भोसरीला डावलल्याने महापौरांसह तिघांनी राजीनामा अस्त्र उपसले होते. पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर बंडाळी थंडावली होती. आता महिनाभरानंतर भाजपा नगरसेवक राहुल जाधव यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केला आहे.स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागल्यानंतर अध्यक्षपदाचे दावेदार असणाऱ्या आमदार महेश लांडगे गटाचे राहुल जाधव यांच्याऐवजी आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक ममता गायकवाड यांची वर्णीलागली. या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली होती. महापौर नितीन काळजे यांच्यासह राहुल जाधव, क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपात फुट पडण्याची चर्चा होती.दरम्यान, भाजपातील फुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आमदार महेश लांडगे यांची नाराजी दूर केली. त्यानंतर आमदार लांडगे समर्थकांचे राजीनामा अस्त्र म्यान झाले होते. महापौर नितीन काळजे यांनी हे पुन्हा महापालिकेत सक्रीय झाले. स्थायी समितीच्या दोन बैठकाही झाल्या. मात्र, अचानकपणे राहुल जाधव यांचा राजीनामा महापौरांनी मंजूर केला.महापौरांची मंजुरीस्थायी समिती सभापती पदाच्या निवडीवरून आमदार लांडगे समर्थकांनी राजीनामा अस्त्र मागे घेतले होते. मात्र, त्यापैकी राहुल जाधव यांनी अचानकपणे स्थायी सदस्यपदाचा राजीनामा महापौर व पक्षनेत्यांकडे दिला. शिवाय महापौरांनी सोमवारी हा राजीनामा मंजूर केला. आमदार लांडगे गटाची समजूत काढूनही राहुल जाधव यांनी राजीनामा का दिला असावा. अन् महापौर यांनी तो तातडीने मंजूर केला. त्यामागे काहीतरी राजकीय डावपेच असण्याची चर्चा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड