शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

देशाची अस्मिता जपावी - राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:42 IST

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला त्यागाची आणि बलिदानाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहिदांनी आपले प्राण वेचले आहेत.

पिंपरी - भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला त्यागाची आणि बलिदानाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहिदांनी आपले प्राण वेचले आहेत. त्या स्वांतत्र्याचे मोल जाणून प्रत्येक नागरिकाने आपआपल्या पातळीवर देशाच्या अस्मितेसाठी काम करावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.महापालिकेच्या मुख्यप्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. त्या वेळी ते बोलत होते. बुधवारी सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ई प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, राजूमिसाळ, अमित गावडे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, शैलेश मोरे, नगरसदस्या अपर्णा डोके, स्वीकृत सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, बाबू नायर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टिकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता आयुबखान पठाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, फर्स्ट महार रेजिमेंटचे प्रमुख प्रभाकर खराते आदी उपस्थित होते.ज्ञानदीप विद्यालयतळवडे : रुपीनगर येथील रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्यालय व अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयात प्रभात फेरी काढून, ध्वजवंदन, संचलन करण्यात आले. रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयात आयसीआसीआय बँकेचे व्यवस्थापक विशाल थिटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, धनंजय भालेकर, शांताराम भालेकर उपस्थित होते. प्राचार्य सूर्यकांत भसे यांनी स्वागत केले. सुबोध गलांडे यांनी सूत्रसंचालन केले.रयत विद्यार्थी विचार मंचपिंपरी : रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संस्थेच्या कार्याध्यक्षा अंजना गायकवाड व संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी महासचिव संतोष शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनानिम्मित मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व या वेळी विशद करण्यात आले. सहसचिव भाग्यश्री आखाडे यांनी संविधानच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.महाराष्ट्र राज्याचे खजिनदार संदेश पिसाळ, सचिव नीरज भालेराव, सहसचिव मेघा आठवले,उपाध्यक्ष शशिकांत कुंभार, तर पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष रोहित कांबळे, उपाध्यक्ष महेश गायकवाड सचिव आनंद विजापूरे, सहसचिव समाधान गायकवाड, संघटक ऋषिकेश हेंद्रे, सदस्य रेश्माइनकर, प्रीतम वाघमारे, महेश सोनवणे, निखिल मुरकुटे या वेळी उपस्थित होते.दत्तगडावर मंचातर्फे वृक्षारोपणदिघी : स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर दिघीतील दत्तगडावर सांगलीकर विचार मंचतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास नगरसेविका निर्मला गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण उंडे, विकास डोळस उपस्थित होते. एकूण ३५-४० देशी वृक्षांचे रोपण करून संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास सांगलीकर विचार मंचचे अध्यक्ष वसंत शेजाळ व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.तळवडे, रुपीनगरला ध्वजवंदनतळवडे : येथील रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजा शिवछत्रपती विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्योजक राजेंद्र श्रीमंदिलकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रभातफेरी काढण्यात आली. मेजर कौत्सुभ राणे, मनदीप सिंह रावत, हमीर सिंह, विक्रम जीत यांना तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष बाजीराव गारगोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गोपाळ भालेकर, चिंतामण भालेकर, गणपत भालेकर, विठ्ठल भालेकर, सीताराम भालेकर, संस्थेचे संपत भालेकर, नथुराम राक्षे, रमेश भालेकर, सुरेश चव्हाण, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, रवींद्र सोनवणे, शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, धनंजय भालेकर, विलास भालेकर, निवृत्ती भोसले, संदीप चव्हाण, मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी, माधुरी राऊत आदी या वेळी उपस्थित होते.श्री मल्लिकार्जुन प्रतिष्ठाननिगडी : येथील श्री मल्लिकार्जुन प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शिवाजी साखरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. चंद्रशेखर दलाल, मनोहर दिवाण, अरुण सपाटे, सुरेश वाळके, राम सपाटे, विकास साखरे आदी या वेळी उपस्थित होते.भारिप बहुजन महासंघपिंपरी : भारिप बहुजन महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नंबर २७ येथे ध्वजवंदन करण्यात आले. शहर सचिव वैजनाथ उबाळे, चांगदेव लहाडे, छत्रपती मस्के, अशोक बाविस्कर, जयद्रथ क्षीरसागर, ज्ञानेश्वर साळवे, दीपक साळवे, संतोष गायकवाड, विलास उघडे, किशोर लहाडे उपस्थित होते.विशेष मुलांना खाऊवाटपरावेत : सुहृद मंडळ संचालित मूकबधिर शाळा प्राधिकरण निगडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त २०० विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे सचिव सुधीर मरळ व सचिन काळभोर यांच्या हस्ते शाळेत ध्वजवंदन करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, सेवा प्रकल्प संचालक युवराज वाल्हेकर, विकास पाटोळे या वेळी उपस्थित होते. शेखर चिंचवडे, सुभाष वाल्हेकर, गणेश बोरा, वीरेंद्र केळकर, वसंत ढवळे, स्वाती वाल्हेकर, मारुती उत्तेकर, संदीप वाल्हेकर व अभिषेक वाल्हेकर यांनी संयोजन केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या