शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आज पडणारे प्रश्न उद्याचे संशोधन ठरेल

By admin | Updated: January 9, 2017 02:36 IST

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय

निगडी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा तसा महत्त्वाचा विषय आहे. लोक पदवीधर होतात; परंतु त्यांचे वाचन कमी असते. शिक्षणाचे प्रमाण वाढतेय. नुसते पदवीधर होण्याने पुढे काही घडत नाही. वाचनामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. अनेक मोठी माणसे वाचनानेच घडली आहेत. जगात ग्रह, तारे, विमाने अशा कल्पना मांडल्या गेल्या. त्या दिशेने शोध लागत गेले, अशा गोष्टी वाचल्याशिवाय आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मनुष्याची प्रगती अशक्य आहे,असे प्रतिपादन ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.निगडीतील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या दिशा सोशल फाउंडेशनच्या साहित्यिक आपल्या दारी उपक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब भोसले, मानद सचिव बाबूराव जवळेकर, खजिनदार वसंत पवार, प्राचार्या शुभांगी इथापे, अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, शिक्षण मंडळाचेमाजी उपसभापती नाना शिवले उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने जगणे जितके महत्त्वाचे तितकेच जगण्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणेही महत्त्वाचे असते. मुलांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत. कारण जगात जिथे प्रश्न निर्माण होतात तिथेच नवीन काही घडत असते. प्रश्न विचारणे हे ज्ञानाच्या शोधार्थ निघण्याची पहिली खूण असते. याकरिता मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासाठी आणि विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आपला व्यासंग वाढविला पाहिजे. ’’शिवले यांनी प्रास्ताविक केले. संजय कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन महाजन यांनी आभार मानले. उपक्रमाचे संयोजन बाळू गावडे, किरण थोरात, रवींद्र खेडकर व दिशाचे संचालक गुरुदास भोंडवे, प्रवीण कुदळे, नंदकुमार कांबळे, रोहित खर्गे, किशोर जवळकर, संतोष चांदेरे, अविनाश ववले, महेंद्र चिंचवडे, विजय कांबळे यांनी केले. (वार्ताहर)