शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडीचा प्रश्न; पदाधिकाऱ्यांपुढे अधिकाऱ्यांनी घातले लोटांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:21 IST

उड्डाणपुलाखालील वाहतूककोंडीचा प्रश्न ‘जैैसे थे’; नियोजनाअभावी वाहनचालकांना त्रास

भोसरी : वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने भोसरीमध्ये राजमाता जिजाऊ उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, त्याखालील अतिक्रमण आणि त्यावर कारवाईसाठी अधिकाºयांची बोटचेपी भूमिका यामुळे वाहतूककोंडी ‘जैसे थे’ आहे. येथील काही राजकीय पदाधिकाºयांच्या दबावापुढेलोटांगण घालत या अतिक्रमणाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने येथील अतिक्रमणाचा प्रश्न जटिल होत चालला आहे.उड्डाणपुलाखाली अतिक्रमण होऊ नये, यासाठी या ठिकाणी उद्यान विकसित करण्याचे प्रस्तावित होते. उद्यानाबरोबरच वाहनतळ, तसेच पुलाच्या उताराच्या ठिकाणी हिरवळ आच्छादण्यात येणार होती. या कामासाठी स्वतंत्रपणे तरतूददेखील करण्यात आली होती.मात्र, नियोजनाअभावी हा उड्डाणपूल सद्य:स्थितीमध्ये निरुपयोगी ठरत आहे. उड्डाणपुलाखालील जागा अक्षरश: टवाळखोरांचा अड्डा बनली आहे. दिवस-रात्र काही लोक येथे ठिय्या मांडून बसलेले असतात. फेरीवाल्यांनी उड्डाणपुलाखालील जागा म्हणजे हक्काची आणि फुकटची भाजी मंडई करून टाकली आहे.उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना स्वतंत्र वाहनतळाची सोय नाही. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक पुलाखाली मनमानी पद्धतीने वाहन उभे करतात. फेरीवाले, दुकानदार, तसेच फळविक्रेते पुलाखालीच कचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघातही झाले आहेत.भोसरीतून थेट बाहेर पडणाºयांकडून उड्डाणपुलाचा वापर होतो. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश आहे. बसथांबा उड्डाणपुलाखाली असल्याने एस. टी., पीएमपी बसला साइड रस्त्यानेच यावे लागते. त्यामुळे उड्डाणपुलावर तुरळक वाहने दिसत असताना पुलाखाली वाहतूककोंडीचे विदारक चित्र पाहायला मिळते. तीन आसनी, सहा आसनी रिक्षा, खासगी प्रवासी वाहतूक करणाºया लक्झरी बस, मालवाहतुकीची वाहने असा सारा लवाजमा पुलाखाली जमा होत आहे. कोणतीही शिस्त न बाळगता, सर्व नियम धाब्यावर बसवून उभ्या राहणाºया वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.मद्यपींनी या ठिकाणी आपला अड्डा बनवला आहे. उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या वाहनांच्या मधील मोकळ्या जागेत मद्यपींची मैफल रंगत आहे.रात्री-अपरात्री येथून ये-जा करणे महिलांसाठी धोकादायक बनले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक राजकीय पुढाºयांचे या अतिक्रमणाला पाठबळ आहे. कारवाईसाठी येणाºया अधिकाºयांना दमबाजी केली जाते. त्यामुळे याठिकाणी कारवाईला कोणीही धजावत नसल्याची चर्चा आहे.पुलाखालील जागा व्यावसायिकांना आंदण?राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांनी उड्डाणपुलाखालील जागा आंदण घेतल्याच्या आविर्भावात बेकायदा वाहनतळ तयार केले आहेत. हे व्यावसायिक ठरवतील त्यांना या ठिकाणी वाहन लावण्यास मुभा आहे. इतरांना दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने उड्डाणपुलाखालील जागा ताब्यात घेऊन ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबवावी. तसेच उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड