शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉस व्होटिंगने दिला धक्का

By admin | Updated: February 24, 2017 02:35 IST

भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पॅनल टू पॅनल प्रचार करण्याऐवजी स्वत:पुरता

पिंपरी : भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पॅनल टू पॅनल प्रचार करण्याऐवजी स्वत:पुरता मर्यादित विचार केला. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होऊन पॅनलच्या उमेदवारांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ठिकाणी पॅनल निवडून आणण्यात यश मिळाले आहे. शिवसेनेला एकाही ठिकाणी पॅनल निवडून आणणे शक्य झाले नाही. भाजपाने तब्बल दहा ठिकाणी पॅनल निवडून आणले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांनी केवळ आपल्यापुरता विचार केला. नोत्या-गोत्याचाही त्यामध्ये विचार झाला. ज्याचा त्याने विचार केला. मला एक मत द्या, बाकी कोणालाही द्या अशी भूमिका घेऊन केलेला प्रचार त्यांच्या पक्षासाठी घातक ठरला. भाजपाच्या उमेदवारांनी मात्र काहीही होवो, पॅनल टू पॅनल प्रचार करायचा, अशीच भूमिका घेऊन प्रचार यंत्रणा राबवली. प्रभाग मोठा असल्याने सुमारे ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे एकीचे बळ कामी आले. अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात्र स्वत:चा प्रचार करण्यासाठीही वेळ पुरला नाही. एकएकटे मतदारांपर्यंत जाणे त्यांना अवघड झाले. परिणामी ते मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. विकासकामे केली असताना, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या यंत्रणेत राष्ट्रवादी कमी पडल्याने बॅकफूटवर जाण्याची वेळ आली. काँग्रेस पक्षाला तर तब्बल ७० जागांवर उमेदवार देता आले नाहीत. नियोजनाचा अभाव आणि पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात न उतरल्याने काँग्रेस खातेही खोलू शकली नाही. (प्रतिनिधी)योजनांचा अभाव : प्रचारयंत्रणा राबविली नाहीराष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात अनेकजण उतरले. अनेक दिग्गज राष्ट्रवादीतून भाजपात गेले. राष्ट्रवादीला खिंडार पडले. त्यानंतर सावध पवित्रा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार यंत्रणा राबविणे आवश्यक होते. मात्र विकासकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी यश खेचून आणेल, असा विश्वास बाळगून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली. परंतु विकास केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपाने केला. हाच मुद्दा त्यांनी मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न केला.