शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वापराच्या जागा गृहप्रकल्पांमधून गायब

By admin | Updated: December 21, 2015 00:35 IST

विविध गृहप्रकल्पांमध्ये सार्वजनिक वापरासाठी (अ‍ॅमिनिटी स्पेस) विशिष्ट जागा उपलब्ध करून देणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असते.

पिंपरी : विविध गृहप्रकल्पांमध्ये सार्वजनिक वापरासाठी (अ‍ॅमिनिटी स्पेस) विशिष्ट जागा उपलब्ध करून देणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असते. परंतु इमारत बांधून पूर्ण झाल्यावर या सार्वजनिक वापराच्या जागा प्रकल्पातील रहिवाशांना उपलब्ध करून देण्यास बांधकाम व्यावसायिक टाळाटाळ करतात. हे प्रकार आता उघडकीस येऊ लागले आहेत. गृहसंस्थांमधील सदस्य जागरूकता दाखवून सार्वजनिक वापराच्या जागा ताब्यात मिळाव्यात याकरिता पाठपुरावा करू लागले आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्पातील सदस्यांना सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या जागेची माहिती देत नाहीत. ती जागा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याच ताब्यात ठेवतात. बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी सार्वजनिक वापराच्या जागेवर खोली बांधतात. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जवळच आणखी दुसरी इमारत बांधायची असेल, तर ही जागा दोन्ही इमारतींसाठी सार्वजनिक वापराची जागा आहे, असे बांधकाम व्यावसायिक भासवितात. सोसायटीच्या सदस्यांना सार्वजनिक वापराच्या जागेचा विसर पडल्यानंतर बांधकाम व्यावसायिक त्यांच्या हितासाठी ती जागा वापरात आणतात. पिंपरी-चिंचवडमध्ये काही बांधकाम व्यावसायिकांनी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या जागेवर बांधकाम करून पैसे कमावले आहेत. मोकळ्या जागेत नव्या बांधकामासाठी परवानगी मिळवून सदनिका बांधल्या आहेत. त्यामुळे बांधकाम नियमावलीचा आधार घेऊन बांधलेल्या इमारतींच्या ठिकाणी हवा खेळती राहील, अशी स्थिती राहिलेली नाही. एका इमारतीला लागून दुसरी इमारत अशी परिस्थिती पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, भोसरी आणि अन्य भागांत दिसून येते. इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर सदस्यांची सोसायटी स्थापन करून गृहप्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीवर सोपविणे आवश्यक असते. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही पुढील अनेक वर्षे बांधकाम व्यावसायिकांकडेच गृहप्रकल्पाचा ताबा असतो. अनेकदा काही बांधकाम व्यावसायिक त्याच प्रकल्पावर बँकेकडे कर्जाची मागणी करतात. दहा वर्षे अथवा त्याहून अधिक कालावधी लोटला, तरी प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला मिळवून दिला जात नाही. त्यात बांधकाम व्यावसायिकाचा स्वार्थ असतो, हेसुद्धा आता नागरिकांच्या लक्षात येऊ लागले आहे. पिंपरीत एका बांधकाम व्यावसायिकाकडून सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध जागेचा ताबा प्रकल्पातील रहिवाशांना दिला जात नाही. त्यामुळे त्या गृहप्रकल्पातील रहिवासी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)