शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताप्रांतांत उभ्या आहेत विसंवादाच्या भिंती

By admin | Updated: April 5, 2016 00:46 IST

संतश्रेष्ठ नामदेवनगरी : हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोली भाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे.

प्रज्ञा केळकर-सिंग ल्ल घुमानसंतश्रेष्ठ नामदेवनगरी : हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोली भाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे नवे दालन खुले झाले आहे, असा आशावाद पहिल्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला.घुमान येथे सरहद संस्थेने आयोजित केलेल्या दोनदिवसीय बहुभाषिक संमेलनाची सोमवारी दिमाखात सांगता झाली. या वेळी देवी बोलत होते. सुरेखा देवी, गोव्याचे सभापती विष्णू सूर्या वाघ, ज्येष्ठ पत्रकार जतिंदर पन्नू, सरहदचे संजय नहार, भारत देसडला, स्वागताध्यक्ष अरुण नेवासकर, राजन खान उपस्थित होते. अभिनंदन थोरात यांची विशेष उपस्थिती होती.‘संत नामदेवमहाराज की जय’च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. देवी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व राज्यांमध्ये एकात्मता, सांस्कृतिक, सामाजिक ऐक्य नांदत होते. गेल्या काही वर्षांमध्ये हे ऐक्य लोप पावले आहे. गेल्या वीस वर्षांत आपल्याला स्वातंत्र्याच्या मार्गाचा विसर पडला आहे. स्वातंत्र्य आणि स्वत:मध्ये विसंवादाची मोठी भिंत उभी राहिली आहे. दोन प्रांतांमध्ये संवाद, संस्कृतींची ओळखच उरलेली नाही. आपल्याला एकमेकांची साहित्यिक वैशिष्ट्ये माहीत नाहीत, ही मोठी दु:खद बाब आहे. विसंवादाच्या भिंती उभ्या राहिल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या भिंतीमध्ये संवादाची खिडकी दिसू लागली आहे. स्वातंत्र्य पुन्हा एकदा टप्प्यात आलेले असताना ते मिळवण्यासाठी धाडसाने पावले उचलायला हवीत. मानवतेचा आणि भाषिक ऐक्याचा वारसा जपायला हवा. भाषांची सरहद तोडून संस्कृती समृद्ध करायला हव्यात.’’नि. ना. रेळेकर यांच्या ‘संत नामदेव विहंग दर्शन’, सिमरत सुमेरा यांच्या ‘पुखराज’ आणि राजवंद राज यांच्या ‘रागनिया’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.