शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील भारतीयांना संरक्षण द्या

By admin | Updated: March 21, 2017 05:12 IST

अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या

पिंपरी : अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकार कडून कोणते धोरण राबविले जात आहे, असा तारांकित प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यापासून वंशाने भारतीय नागरिक असलेल्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून समजते. याच अनुशंघाने खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेमध्ये तारांकित प्रश्न विचारला.बारणे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०१६ मध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत आण्विक उर्जा, संरक्षण आणि सुरक्षा अशा विषयांवर दोन्ही देशामध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले होते. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यानंतर अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या व्यवसायावर याचा असर पडत असून या मुळच्या भारतीय नागरिकांना आपले व्यवसाय वाचविण्याचे मोठे आव्हान असल्याचे मागील काही दिवसांपासून मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. याच काळात काही भारतीयांवर अमेरिकेत हल्ले करण्यात आले होते त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी भारत सरकार कडून कोणते धोरण राबविले जात आहे, असा प्रश्न बारणे यांनी निर्मला सीतारमण यांच्यासमोर लोकसभेत उपस्थित केला. (प्रतिनिधी)