शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

प्रचारतंत्र बदलले,पण...

By admin | Updated: January 23, 2017 02:58 IST

काही वर्षांपूर्वी निवडणुका जवळ आल्या, की मावळातील गावांमधील पार, चहा टपऱ्या, हॉटेलमध्ये गप्पांचे फड रंगायचे. त्या वेळी

कामशेत : काही वर्षांपूर्वी निवडणुका जवळ आल्या, की मावळातील गावांमधील पार, चहा टपऱ्या, हॉटेलमध्ये गप्पांचे फड रंगायचे. त्या वेळी श्यामराव, भीमराव अशी बिरुदे मिरवणारे गावातील पुढारी आता दादा, भाऊ, नाना, साहेब आदी नावाने ओळखू लागले आहेत. ज्याप्रमाणे नावांच्या उपाध्यांमध्ये बदल होत गेला. त्याप्रमाणे निवडणुकीचे तंत्र व गावेही बदलत गेली. तालुक्यातील इच्छुकांच्या नावाचा डंका पिटवत गावच्या पारावर बसून तंबाखू-बिडीच्या सोबत रंगणाऱ्या चर्चांनी सकाळ व सायंकाळी पार गजबजून जायचा. खेड्यापाड्यामधील लोक दिवसभर शेतात राबून औंदा कोणता उमेदवार निवडून द्यायचा याची चर्चा करत बसायचे. त्या वेळी घोंगडी बैठका, गावभेटी, घरभेटी, धावता दौरा, गावातील प्रमुखांशी संवाद, नातेसंबंध आदींच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांची प्रचार कामे चालत. याशिवाय बैलगाडी, सायकलींना झेंडे लावून प्रचार चालायचा. कधी तरी एखादा जिल्हा पातळीचा नेता गावात मोटारगाडी घेऊन आल्यानंतर मोटारगाडी व नेता पाहण्यासाठी गर्दी जमायची. धुरळ्यात त्या मोटारगाडी मागे मुलांबरोबर गावातील राजकारणीही पळायचे. पण काळ बदलला व गावेही बदलू लागली. सायकलीच्या जागी दुचाकीने प्रवेश केला. टपालच्या जागी मोबाइल फोन आले. दुर्गम भागांतील गावांपर्यंत खड्ड्यांचे का होईना पण रस्ते पोहचले. सर्व काही जवळ जवळ आले. स्मार्ट फोनबरोबर थ्री जी व फोर जीचा जमाना आला. इंटरनेट रीचार्ज नागरिक व तरुण करू लागले. सोशल मीडियाचा वापर वाढला. शुभप्रभात व शुभरात्रीचे मेसेज फिरू लागले. कार्यकर्तेही भाऊ, दादा, नाना झाले. नेत्यांबरोबर सेल्फीचा जमाना आला. सोशल मीडियातून प्रसिद्धीचा फायदा राजकारण्यांना तर झालाच पण गावोगावी पुढारी जन्माला येऊ लागले. सभांमध्ये कानाजवळ जाऊन फोटो काढून भाऊंची अमुकतमुक नेत्यांबरोबर गंभीर विषयावर चर्चा असे फोटो सोशल मीडियावर अपलोड होऊ लागले. (वार्ताहर)