शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

प्रचारात सैराट, शांताबाई गाण्याची धूम

By admin | Updated: February 20, 2017 02:54 IST

झिंग झिंग झिंगाट, शांताबाई, बाई वाड्यावर या, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपत हाय ! यांसह अनेक चित्रपट व लोकगीतांच्या

रहाटणी : झिंग झिंग झिंगाट, शांताबाई, बाई वाड्यावर या, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपत हाय ! यांसह अनेक चित्रपट व लोकगीतांच्या चालीवरील निवडणूक प्रचाराची गाणी शहरवासीयांच्या कानावर आदळत आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत याच गाण्यांची क्रेझ अधिक होती. प्रचार थंडावताच कर्णकर्कश आवाजाच्या त्रासातून मुक्ती मिळाल्याने मतदारांनी नि:श्वास सोडला. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच उमेदवारांनी प्रचारासाठी स्वत:च्या आवाजाचे रेकॉर्डिंग केलेली माहिती एलईडी स्क्रीनवर दाखविण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था केली होती. शांताबाई, झिंगाट, बाई वाड्यावर या, वाट बघतोय रिक्षावाला यासह अनेक गाण्यांच्या चालीवर त्यांनी स्वत:ची महती व्यक्त करणारी गीते रेकॉर्डिंग केली होती. दहा दिवसांपासून शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहत होते. अगदी सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत निवडणुकीचे कार्यकर्ते प्रचार करीत होते. आॅटो रिक्षा ,जीप या वाहनांवर स्पीकर लावून उमेदवारांची माहिती दिली जात होती. गल्लीबोळात चकरा मारणाऱ्या रिक्षांमुळे शांतता भंग झाला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत मुख्य रस्ते, अनेक मुख्य चौक या ठिकाणी एलईडी व्हॅन, टेम्पो, रिक्षा यांच्या माध्यमातून तर पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत होता. अनेक वेळा एखादी एलईडी व्हॅन एका चौकात लावली की, तासन्तास एकाची ठिकाणी उभी असे. त्यामुळे चौकातील व्यावसायिक व त्या परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजाने गेल्या काही दिवसांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सुरूअसलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. अखेर नागरिकांनी रविवारी सुटकेचा नि:श्वास सोडला.