शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गात समस्यांचा अडथळा, वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:33 IST

शगून चौकात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता या मार्गाने हायवेला जाणे सोयीस्कर व्हावे याकरिता पिंपरीतील साई चौकात महापालिकेतर्फे किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग बनविला होता

पिंपरी : शगून चौकात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता या मार्गाने हायवेला जाणे सोयीस्कर व्हावे याकरिता पिंपरीतील साई चौकात महापालिकेतर्फे किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग बनविला होता. मात्र, याउलट सध्या नागरिकांना या मार्गातून प्रवास करताना समस्यांचा अडथळा पार करावा लागत आहे.काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या भुयारी मार्गात खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. भुयारी मार्गातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. साई चौकातून हायवेकडे जाताना मार्गाच्या सुरुवातीला मोठे खड्डे पडले असून मार्गाच्या दुसºया बाजूलाही मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या ठिकाणी ड्रेनेजसाठी टाकण्यात आलेले लोखंडी पाईप रस्त्यावर आल्याने वाहन घसरून अपघात होतात. मार्गात प्रवेश करताना चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण जाते. खड्ड्यामुळे वाहने खड्ड्यात आदळून वाहनांचे प्रंचड नुकसान तर होतेच त्याबरोबरच वाहन घसरून अपघाताचीही दाट शक्यता आहे. तसेच या पुलाला खालच्या भागास भेगा पडल्या असून यातून सतत पावसाचे पाणी पडत असल्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे पार्क केलेली असतात़ वाहनचालकांना पुढे येऊन वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.भुयारी मार्गाच्या बाहेरील बाजूस सायंकाळी खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स लावलेले असतात. परिसरातील नागरिक, खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक या ठिकाणी आपली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करून खरेदीसाठी व खाद्यपदार्थ खाण्यासाठी जातात. त्यामुळे रस्ता अरुंद बनतो. परिणामी या ठिकाणी सायंकाळी वाहतुककोंडीत भर पडते. काही वाहनचालक वळणावर चारचाकी गाड्या उभ्या करतात. त्यामुळे प्रसंगी अपघातासह निमंत्रणही मिळते. तसेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी आलेले ग्राहक या ठिकाणी थांबल्याने गर्दी वाढते. खाद्यविक्रेते त्यांच्याकडील खरकटे, उरलेले अन्न, डिश या ठिकाणी पाहिजे त्या टाकतात. त्यामुळे दुर्गंधीचा त्रासही वाहनचालकांना सहन करावा लागतो.