शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी रोखणार

By admin | Updated: November 8, 2016 01:36 IST

औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखून परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करणार आहे. तसेच महामार्ग व औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे दुभाजक तोडणाऱ्या

तळेगाव दाभाडे : औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखून परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करणार आहे. तसेच महामार्ग व औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे दुभाजक तोडणाऱ्या ढाबे, हॉटेल व हॉस्पिटलवर कारवाई करणार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे सोमवारी आयोजित औद्योगिक क्षेत्रातील समस्या व उपाययोजना कार्यक्रमात नांगरे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘१००, १०३ व १९१ क्रमांक हे शहरी नेटवर्क टॉवरला जोडल्याने ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास उशीर होतो. गुन्हेगार लूटमार करून व दरोडा टाकून पसार झाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन कार्यवाहीत वाढ होते. जेलमधून बाहेर आल्यास त्यांना गुन्हेगारीचे प्रमाणपत्रच मिळाल्यागत बिनधास्त गुन्हे करतात. १००, १०३ व १९१ क्रमांक हे ग्रामीण नेटवर्क टॉवरला जोडण्याचा प्रस्ताव दाखल केला असून, पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने गुन्हेगारी कारवाया रोखता येतील.’’ एल अ‍ॅण्ड टी प्रकल्पप्रमुख कॅप्टन ब्रिजेश कालरा, जी एम प्रकल्पप्रमुख प्रवीण पत्रावली यांनी मनोगत व्यक्त केले.जेसीबी प्रकल्पप्रमुख डॉ. संतोष गोपीनाथ यांनी प्रास्ताविक केले. सुचित्रा तबीब यांनी सूत्रसंचालन केले. जेसीबी एचआर प्रमुख विवेक गगपल्लीवर यांनी आभार मानले. पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक बरकत मुजावर, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, अरुण मोरे, विश्वंभर गोल्डे, मुगुटराव पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)