शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By admin | Updated: September 23, 2015 03:23 IST

गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह, बीएसएफ, स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), होमगार्ड, तसेच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी

पिंपरी : गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह, बीएसएफ, स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), होमगार्ड, तसेच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी अशी जादा कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण राहावे, या उद्देशाने वाहतूक नियोजन केले असून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते काही बदल केले आहेत. शहरातील विविध १४ घाटांवर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शहरात एकूण १४३५ गणेशोत्सव मंडळे आहेत. विविध १४ विसर्जन घाटांवर टप्प्याटप्प्याने विसर्जन होणार असले, तरी सातव्या, नवव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीदिनी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार असल्याने आतापासूनच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिंचवड येथील पवना घाट, पिंपरी सुभाषनगर येथील विसर्जन घाट, निगडीतील गणेश तलाव, सांगवीतील घाट आणि भोसरीतील तलाव या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दुचाकीवरील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातील दोन दुचाकीवर विविध ठिकाणी फेरफटका मारतील. ठिकठिकाणी टेहळणीसाठी ‘टॉवर’ उभारले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)