शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मावळात प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 19, 2017 04:42 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मावळ तालुक्यातील तयारी पूर्ण झाली असून, २१६ मतदान केंद्रांवर १४२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मावळ तालुक्यातील तयारी पूर्ण झाली असून, २१६ मतदान केंद्रांवर १४२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यक इव्हीएम मशिन उपलब्ध असल्याने निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक अधिकारी सुभाष बागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी सांगितले. तालुक्यात निवडणुकीची आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. दि. २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, दि. २३ला मतमोजणी होणार आहे. पंचायत समितीच्या १० गणांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या पाच गटांतील जागांसाठीच्या निवडणुकीची सर्व प्रकारची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण १ लाख ७६ हजार ३७८ मतदार असून, यामध्ये ९२ हजार ३५३ पुरुष, तर ८४ हजार २५ महिला मतदार आहेत. एकूण २१६ मतदान केंद्रे आहेत. मतदान काळात अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. दि. २० फेबुवारीला मतदान साहित्याचे वाटप तहसील कार्यालय, वडगाव येथे करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वार्ताहर) तीन गट, पाच गण संवेदनशीलतालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट, तर पंचायत समितीचे पाच गण संवेदनशील व अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यात सर्वांत चर्चेत असणाऱ्या वडगाव खडकाळा, इंदोरी सोमाटणे व महागाव चांदखेड गटांचा समावेश आहे. पंचायत समिती गणातील सोमाटणे, बेबडओहळ, खडकाळा, आढे, आढले बुदु्रक या गण, गावांचा समावेश आहे. या सर्वच गट आणि गणांमध्ये राजकीय गट आहेत. अनेक वेळा या गावांमध्ये निवडणुकीच्या काळात दोन गटांत भांडण होऊन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या केंद्रांवर १०० मीटरवर पोलीस कर्मचारी नियुक्ती व सेक्टर पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.