शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमलोक पार्कलाच आयुक्तालय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:59 IST

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पाहणी केली. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील जागा सोईस्कर असल्याचे परिमंडल तीनचे

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पाहणी केली. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील जागा सोईस्कर असल्याचे परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला कळविले़ मात्र काही संघटनांनी शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास देण्यास विरोध दर्शविला होता. तो विरोध मावळला असून, स्थानिकांनी या ठिकाणी आयुक्तालय होण्यास संमती दिली आहे. दरमहा १६ लाख २२ हजार ७६७ रुपये भाडे आकारणीचा दर महापालिकेने निश्चित केला आहे.राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर दीड महिना उलटला, महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्तालय सुरू होणार, अशी नागरिकांना अपेक्षा होती. महाराष्टÑदिनाचा मुहूर्त टळला. आता १५ आॅगस्टचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.शहरात पालिकेच्या १२ इमारती आणि ६ मोकळ्या जागा आहेत. त्यातून जागा निश्चित करण्यासाठी कामाचा वेग वाढवा, त्यानंतर मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे शहर पोलीस अधिकाºयांना दिले होते. त्यानंतर जागा निश्चितीसाठी पोलीस अधिकाºयांची पुन्हा धावाधाव सुरू झाली आहे.