पिंपरी : सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वर्गणी द्यावी, अशी मागणी करीत वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या एकाला वर्गणी मागणाऱ्या टोळक्याने बेदम मारहाण केली. टूल्सच्या दुकानातील हातोडा मारल्याने दुकानातील व्यक्ती जखमी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवडजवळ घडली. रात्री उशिरापर्यंत चिंचवड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आनंदनगर येथील काही कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत होते. दोन दिवसांपूर्वी टूल्सच्या दुकानातील कामगाराकडे त्यांनी वर्गणीची पावती फाडली होती. दुकानाचे मालक नाहीत, ते आल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेऊन देतो. असे दुकानातील कामगाराने सांगितले होते. पैसे का देत नाही, असे म्हणत एका कार्यकर्त्याने दुकानातील हातोडा उचलून दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात मारला. कामगार जखमी झाला. (प्रतिनिधी)
वर्गणीच्या वादातून टोळक्याची मारहाण
By admin | Updated: March 27, 2017 03:04 IST