शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांवर पूर्वतयारी

By admin | Updated: February 21, 2017 02:58 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून, शहरातील १२ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून, शहरातील १२ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतर्गत असणाऱ्या ३२ प्रभागांत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, मतदान यंत्र आणि साहित्याचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदान केंद्र, सहायक मतदान केंद्र प्रमुख, केंद्रप्रमुख कर्मचारी मतदानकेंद्रावर दाखल झाले आहेत. मतदान खोल्यांमध्ये विविध मूलभूत सुविधा व मतदानासाठी एकूण १६०८ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असणार आहे. शहर परिसरात एकूण १६०८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मनपा शाळा व इमारतींचा समावेश असून १५९ मनपा शाळा, ३२४ खासगी इमारती, १ शासकीय व २ एमआयडीसी इमारती अशा एकूण ४८६ इमारतींचा अंतर्भाव आहे. निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ११ लाख ९२ हजार ८९ असून पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ४० हजार ६९६ आहे, तर महिला मतदार संख्या ५ लाख ५१ हजार ३६२ आहे. पुरूष मतदार ५३.७४ टक्के तर महिला मतदारांची संख्या ४६.२५ टक्के आहे. इतर मतदार ३१ असून  त्यांची संख्या ०.००२६ टक्के आहे. मतमोजणी शांततापूर्ण व  सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी  एकूण ८९२५ कर्मचारी व  १७८५ पोलीस कर्मचारी अशा  एकूण १० हजार ७१० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या. (प्रतिनिधी)