शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

खोदकाम करताना तब्बल ४०५ वेळा तुटली वीजवाहिनी: महावितरणला लाखो रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 21:32 IST

सांगवी आणि थेरगाव मधील नागरिकांना पाहावा लागतोय विजेचा लपंडाव....

पिंपरी : रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामामुळे भूमिगत वीज वहिनी तुटल्याने सांगवी आणि थेरगाव परिसरातील नागरिकांना विजेचा लपंडाव पहावा लागत आहे. गेल्या वर्षभरात खोदकाम करताना तब्बल ४०५ वेळा वीज वाहिनी तुटल्याच्या घटना या परिसरात घडल्या. त्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अनुभव नागरीक घेत आहेत. एप्रिल २०२० पासून महावितरणच्या उच्चदाब ७४ आणि लघुदाबाच्या ३३१ भूमिगत वाहिन्या तोडण्यात आल्या. रस्ता रुंदीकरण, पाणी आणि ड्रेनेज पाईप लाईन टाकण्यासाठी, तसेच खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई करताना वीज वाहिन्या तुटल्या आहेत.  पिंपरी विभागातील सांगवी उपविभागा अंतर्गत वाकड, ताथवडे, जुनी व नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, विशाल नगर, थेरगाव येथील वीज पुरवठा या खोदकामामुळे प्रभावित झाला आहे. महावितरणची उच्चदबाची वीज वहिनी २६ मार्च रोजी तोडण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या राहाटणी येथील १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले. त्यामुळे सांगवी विभागातील १ लाख ९० हजार ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या सर्व सात वाहिन्या बंद पडल्या. अजस्त्र रोहित्र बदलण्यास आठ दिवस लागले. या काळात पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. भार व्यवस्थापन शक्य न झाल्याने चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले. अशा प्रकारामुळे महावितरणला दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागतो. तसेच वीज विक्रीमध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागते. रस्ते खोदाईपूर्वी महावितरणला कल्पना दिल्यास असे प्रकार टाळता येतील असे महावितरणने स्पष्ट केले.-----...तर संगवीतील रुग्णालयांचा वीज पुरवठा होईल खंडित

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पीडब्ल्यू मैदानावर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या परिसरात इतरही अनेक रुग्णालये आहेत. रस्ते खोदाईमुळे रुग्णालयांच्या वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. महावितरणला कोणतीही पूर्व सूचना न देता खोदकाम करू नये. खोदकामाची पूर्व कल्पना दिल्यास वीज वाहिन्यांना धोका होणार नाही. खोदाईत वीज वाहिनीचे नुकसान झाल्याप्रकरणी सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडThergaonथेरगावSangviसांगवीmahavitaranमहावितरण