शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कामशेतमध्ये पोतराजांची पडली पालं; कर्नाटकातून कुटुंबासह दाखल, २५ वर्षांपासूनचा शिरस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 14:08 IST

कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत. 

ठळक मुद्देहातातल्या कोरड्याने स्वत:च्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरतात पोतराजवीस ते पंचवीस वर्षांपासून कामशेतमध्ये येतो आठ कुटुंबाचा सुमारे तिसेक जणांचा कुटुंबकबिला

कामशेत : कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत. सगळी गडीमाणसे, स्त्रीया कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता गावोगावी भटकंती करतात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका, यलम्मा, येडाई, काळूबाई, मरीमाता या शक्तिपीठांची वंशपरंपरागत पूजा करीत तिला डोईवर घेऊन गावोगावी भटकंती करतात. पायपीट करीत खेडेगावातून देवीला केलेल्या नवसातून मिळणाऱ्या चिजवस्तू पैसे यातून गुजराण करीत आहेत.हातातल्या कोरड्याने (चाबकाने) स्वत:च्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती पोतराज फिरतात. मोकळ्या सोडलेल्या केसांच्या जटा, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार केलेले घागरावजा वस्त्र, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेली आणि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज व त्याच्या बरोबर डोक्यावर देवीचा मरीआईचा डोलारा व कडक लक्ष्मीचा साज घेऊन भटकंती करणारा पोतराज सर्वांचाच औत्सुक्याचा असतो. पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी डफडे वाजवत गावात येतो व गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो. मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडनाचा मार्ग अवलंबतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभेवती मारतो. त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. मग, त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते ही प्रथा ग्रामीण भागात अजूनही टिकून असून, अनेक पोतराज यावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. कर्नाटकातील रहिवासी असलेले व सद्या बारामतीमध्ये राहणारे निंबाळकर कुटुंबातील मारुती, सुरेश, नारायण हे तीन भाऊ, त्यांची मुले, सुना, नातवंडे आदी आठ कुटुंबाचा सुमारे तिसेक जणांचा कुटुंबकबिला वीस ते पंचवीस वर्षांपासून संक्रांतीच्या सणाच्या एक महिना अगोदर कामशेतमध्ये येतोच. 

मुलांच्या शाळेला महिनाभराची सुटीकामशेत गावठाणातील मोकळ्या जागेत या पोतराजांची पालं उभी राहिली असून, मोठी मंडळी सकाळी सकाळी देवीचा डोलारा घेऊन कामशेत व आजूबाजूच्या गावांमध्ये भिक्षेसाठी जात आहेत. तर लहान मुले आजूबाजूच्या घरी भाकरी मागून खेळत खेळत आपल्या झोपड्या सांभाळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व लहान मुले ही शाळा शिकत असून, सुमारे एक महिना सुटी घेऊन आपल्या घरच्यांना मदतीसाठी येतात. सुमारे तिसेक शाळेत जाणारी बालवाडी ते आठवीत शिकणारी पोरे शाळेतून सुटी घेऊन महिनाभरासाठी आपल्याकडे येतात. अगोदर जनता वसाहतीत राहणारी ही मंडळी आता मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात हडपसरला स्थायिक झाले आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड