शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वीजतारांमुळे दुर्घटनेची शक्यता

By admin | Updated: October 5, 2015 01:42 IST

येथील विल्यमनगर, ओंकार कॉलनी, त्रिमूर्तीनगर, भाऊनगर, पंचरत्ननगर आदी परिसरात उच्च दाबाच्या वीज तारांमुळे स्पार्क होऊन आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बलभीम भोसले, पिंपळे गुरव येथील विल्यमनगर, ओंकार कॉलनी, त्रिमूर्तीनगर, भाऊनगर, पंचरत्ननगर आदी परिसरात उच्च दाबाच्या वीज तारांमुळे स्पार्क होऊन आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून भूमिगत केबलच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. परिसरातील बहुतांश ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी अनेक वर्षांपासून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून कामाच्या संदर्भात चर्चा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी महावितरणकडून या कामास मान्यता दिली आहे. मात्र या कामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. कंपनीकडून या कामात चालढकल क ेली जात आहे. केबलचे शॉर्टेज आहे. काम सुरू करणार आहे. या प्रकारची विविध कारणे सांगितली जात आहेत. ३० वर्षांपासून एकच वीजमीटर असून, एकाच मीटरवर संपूर्ण इमारतीचे कनेक्शन आहे. त्या इमारत मालकावर कारवाई केली जात नाही. याबाबत १ जून २०१५ रोजी वरिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. तीन मीटर खोदाई करून भूमिगत केबल टाकायची असताना कमी रुंदीची केबल टाकली जाते. कंत्राटदार व महावितरण यांच्या संगनमताने दीड मीटर खोदाई करून केबल टाकली जाते. नंतरच्या खोदकामामुळे केबल तुटते. त्यामुळे अनेक दिवस वीज बंद होण्याचे प्रकार घडतात. अधिकृत वीजमीटर घेण्यासाठी २५०० रुपये खर्च अपेक्षित असताना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एजंटद्वारे ग्राहकांकडून ८ ते १० हजार रुपये घेतले जातात. या एजंट लोकांना महावितरणकडून पाठबळ मिळत आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक

जर एखाद्या एजंटने वीज मीटरसाठी अधिक रक्कत घेतली असेल, तर त्याचे पुरावे द्यावेत. संबंधितावर लगेच कारवाई केली जाईल. या भूमिगत कामामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. दोन दिवसांच्या आत या कामास सुरुवात केली जाईल. बीव्हीजी कंपनीकडे गणेशोत्सव काळामध्ये मजूरवर्ग उपलब्ध नव्हता. या कामामध्ये लक्ष घालून दोन दिवसांच्या आत या कामास सुरुवात करणार आहे. - धनंजय औंढेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण वीजवाहक तारांच्या खाली पदपथ असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर भाजीविके्रते, वडापाव, पीठ गिरणी, किराणा आदीची दुकाने असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी ये-जा करतात. या वीजवाहक तारा रस्त्यावरील झाडांमध्ये अडकल्यामुळे संततधार पावसामध्ये झाडावर स्पार्किंग सुरूअसते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. - संदीपान बोऱ्हाडे, रहिवासी