शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

बोपखेल प्रश्नावर सकारात्मक चर्चा

By admin | Updated: April 1, 2016 03:23 IST

आठ तासांच्या पूर्वनोटिशीने बंद केलेला बोपखेल रस्ता व रक्षक सोसायटीकडून विशालनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समवेत भाजपाच्या

पिंपरी : आठ तासांच्या पूर्वनोटिशीने बंद केलेला बोपखेल रस्ता व रक्षक सोसायटीकडून विशालनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समवेत भाजपाच्या लोकप्रतिनिधींची सकारात्मक चर्चा आज झाली. संरक्षणमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना रस्त्याविषयी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील दोन्ही रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली.बोपखेल व रक्षक सोसायटीनजीकच्या रस्त्यासंदर्भात दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्या वेळी पुण्यातील खासदारांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती. त्या वेळी संरक्षणमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पर्रीकर यांनी पुणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज येथे बैठक बोलावून लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी खासदार अमर साबळे व अनिल शिरोळे यांच्यासह सी. एम. ई. व रक्षकचे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पुणे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड आयुक्त राजीव जाधव, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, संजय काटे, शत्रुघ्न काटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सौरभ राव व पिंपरी-चिंचवड आयुक्त राजीव जाधव यांनी बोपखेल रस्ता करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. या रस्त्यासाठी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी खडकी यांनी ६ एप्रिलच्या आत ना-हरकत द्यावे, असे आदेश पर्रीकर यांनी दिला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सदर रस्ता करण्याच्या निविदा काढून रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त राजीव जाधव यांनी दिले.(प्रतिनिधी)संरक्षण मंत्र्यांनी दोन्ही रस्त्यांच्या प्रश्नाची माहिती घेतली. पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटीच्या सीमाभिंतीस लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्त्याचे काम बंद पाडले होते. या रस्त्याबाबत महापालिकेकडून अंडरटेकिंग घेऊन १२ मीटरचा रस्ता करण्यास लष्करी अधिकाऱ्यांनी त्वरित ना हरकत देण्याचे आदेश संरक्षणमंत्र्यांनी दिले. त्यामुळे दोन्ही रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.- अमर साबळे, खासदार.पिंपरी-चिंचवड हद्दीतील दोन्ही प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. या विषयी संरक्षण मंत्र्यांनी लष्करास सूचना केल्या आहेत. त्यामुळे कार्यवाही पूर्ण झाल्यास हा प्रश्न मार्गी लागणार आहे.- राजीव जाधव, आयुक्त