शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील लाचखोरीवरून राजकारण

By admin | Updated: April 29, 2017 04:13 IST

महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के आणि उपद्रव शोध पथकात काम करणाऱ्या अजय सिन्नरकर यांना लाच घेताना पकडले.

पिंपरी : महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के आणि उपद्रव शोध पथकात काम करणाऱ्या अजय सिन्नरकर यांना लाच घेताना पकडले. पारदर्शकतेचा टेंभा मिरविणाऱ्या महापालिकेत आयुक्तांचा सहकारी लाच घेतो. या प्रकरणाचा निषेध करण्यापेक्षा लाचखोरीवरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. लाचखोरीच्या प्रकरणाकडे भाजपाच्या नेत्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष करीत विरोधकांवर टीका करण्यास सुरवात केली आहे.महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर एकापाठोपाठ एक लाचखोरीचे प्रकरण उजेडात आले आहे. महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाचखोरीवरून भाजपा व राष्ट्रवादी उणेदुणे काढू लागली आहे. व्यक्तिगत आरोप प्रत्योरोप सुरू आहेत. त्यामुळे शहरवासीयांचे मनोरंजन होत आहे.भाजपाच्या नगरसेविका सुजाता पालांडे म्हणाल्या,‘‘महापालिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाला लाच प्रकरणात झालेल्या अटकेवरून माजी महापौर मंगला कदम यांनी आकांडतांडव करणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को,’ अशी परिस्थिती आहे. महापालिका ताब्यात असताना ज्यांनी भ्रष्टाचाराचा कळस केला, त्यांनीच आज भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे मोठा विनोदच आहे. राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासूनच महापालिकेतील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना लाचखोरांना अभय दिले होते. दोन सत्ताधाऱ्यांमधील हा फरक जनतेला कळला. त्यामुळे सत्तांतर झाले. विरोधकांच्या काळात महापालिकेकडे पैसे असूनही त्याप्रमाणात शहराचा विकास झाला नाही.’’ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी भाजपाच्या कारभारावर टीका केली. तसेच, महापालिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाला लाच प्रकरणात झालेल्या अटकेवरून भाजपचा चेहरा असलेले आयुक्त दिनेश वाघमारे यांचाही लाच प्रकरणात हात असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला. (प्रतिनिधी)