शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बसपासचे धोरण ठरविणार

By admin | Updated: May 5, 2017 02:36 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासपोटी सुमारे दोन कोटी ३७ लाख रुपये इतकी

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध प्रकारच्या सवलतीच्या दरातील पासपोटी सुमारे दोन कोटी ३७ लाख रुपये इतकी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका पुणे महानगर परिवहन महामंडळाला देण्याच्या विषयावर चर्चा झाली. कायोत्तर मान्यता देताना पास विषयक धोरण निश्चित करावे, आढावा घ्यावा, असे स्थायी समितीने प्रशासनास आदेश दिले आहे. पीएमपीतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिक, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बसपास सवलतीच्या दरात देण्यात येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक पास, महापालिका सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांना मासिक पास, दैनंदिन पास हे ४० टक्के रकमेवर देण्यात येतात. त्याचप्रमाणे विविध अंध व्यक्ती, महापालिकेतील चालक, शिपाई, केंद्र व राज्य सरकारचे विशेष प्रावीण्य मिळालेल्या व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक आदींना मोफत पास देण्यात येतात. सन २०१५-१६ या वर्षासाठी सर्व सवलतींच्या दरातील पासपोटी पीएमपीच्या सहव्यवस्थापकांनी २१ कोटी, ५० लाख, ११ हजार, २१४ रुपयांची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली होती. मात्र, तपासणीअंती ती रक्कम २० कोटी, ३७ लाख, ८० हजार, ८८७ रुपये इतकी झाली. त्यापैकी १८ कोटी इतकी रक्कम ५ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावानुसार दिली आहे. उर्वरित २ कोटी, ३७ लाख, ८० हजार, ८८७ इतकी रक्कम पीएमपीला द्यावयाची आहे. ही रक्कम देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. कायोत्तर मान्यतेचा विषय मंजूर करताना सदस्यांनी धोरण राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘पीएमपीचा विषय मंजूर करीत असताना याबाबत निश्चित असे धोरण ठविण्यात यावे, सद्या अस्तित्वात असणाऱ्या धोरणाचा आढावा घ्यावा, असे आदेश प्रशासनास दिले आहेत. (प्रतिनिधी)मोफत पास : ५९७ जण लाभार्थीविविध प्रकारचे सवलतीचे पास मिळविणाऱ्यांमध्ये ५९७ जण हे मोफत पासचे लाभार्थी आहेत. त्यामध्ये ३८ महापालिका सेवेतील चालक, शिपाई, ५९ पत्रकार, ३ केंद्र व राज्य सरकारचे विशेष प्रावीण्य मिळालेले, तर ३३९ स्वातंत्र्यसैनिक, तर १५८ अंध व्यक्ती आहेत. पुणे महापालिकेने पासविषयी वर्षातील एकूण रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम पासधारकाने भरणे आवश्यक आहे. त्यामुळे हेच धोरण पिंपरीतही राबविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोफत पास धारकांसाठी नवे धोरण अडचणीचे ठरणार आहे.