शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा धाक नसल्याने आरोपी सैराट?

By admin | Updated: April 26, 2017 03:49 IST

मावळमध्ये दिवसेंदिवस खून, चोऱ्या, अवैध धंदे वाढत चालले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

वडगाव मावळ : मावळमध्ये दिवसेंदिवस खून, चोऱ्या, अवैध धंदे वाढत चालले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. वाढत चाललेली गुन्हेगारी चिंतेची बाब असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पोलीस मात्र काही घडतच नाही असा दिखावा करत आहेत़ गेल्या तीन दिवसांत तालुक्यात ५ खून झाले असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांना संशय येऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चोर असल्याच्या अफवा येत होत्या. त्यासाठी गावागावांत नागरिक रात्रभर गस्त घालत असत. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी घरावर दगड पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत नागरिकांनी पोलिसांनादेखील वेळोवेळी कळवले होते; परंतु या सर्व अफवा आहेत, यावर विश्वास ठेवू नका, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. परंतु, धामणे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर तालुक्यात चोर आहेत असा नागरिकांचा ठाम विश्वास झाला व चोर असल्याच्या अफवा सांगणाऱ्या पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे. तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस कोठेही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. तळेगावचे माजी नगराध्यक्षाचा भर दिवसा खून, तळेगावातील महाविद्यालयातील विद्यार्ध्याचा खून, लोणावळ्यातील युवक युवतीचा खून, सांगवडे येथील सरपंचाच्या पतीचा खून, या घटना ताज्या असताना धामणे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाच घरातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर काही वेळातच लोणावळा येथील कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या सर्व घडामोडीवरून हे स्पष्ट होतंय की तालुक्यात पोलिसांची कोणताही वचक राहिली नसून, गुन्हेगाराला पोलिसांची भीतीच राहिली नाही. मावळात खून, दरोडे अशा काही घटना घडल्या की पोलीस तालुक्यातील पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक बोलावतात आणि त्यांनाच मार्गदर्शन करतात. (वार्ताहर )