शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील स्मशानभुमीत कवींनी जागविली रात्र

By admin | Updated: April 1, 2017 01:40 IST

बंडखोर सांस्कृतिक आंदोलन यांच्या वतीने सोमवारी सोमवती अमावास्येच्या रात्री कैलासनगर स्मशानभूमी, लोणावळा

लोणावळा : बंडखोर सांस्कृतिक आंदोलन यांच्या वतीने सोमवारी सोमवती अमावास्येच्या रात्री कैलासनगर स्मशानभूमी, लोणावळा येथे विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन केले होते. या विद्रोही कविसंमेलनात विविध कवींनी सहभाग घेऊन काव्य सादर केली. काव्यरसिकांनी चांगली उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्मशान व अमावास्या हे दोन्हीही तसे वर्ज्यच मानले जाते. त्यामुळे अंत्यसंस्काराव्यतिरिक्त माणसे स्मशानाकडे वळत नाहीत. जनमाणसातील या अज्ञान व अंधश्रद्धेच्या परंपरा मोडीत काढत विद्रोही कवी साहित्यिकांनी या संमेलनात क्रांतिकारी कवितांतून बंडखोरी व सांस्कृतिक आंदोलन केले. जिवंत माणसांच्या संवेदना बोथट झाल्या असून, समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, बेरोजगारी, शोषण व विषमतेच्या विरोधात हुंकार उमटत नाहीत. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन वंचितांमध्ये न्याय्य हक्काची जाणीव निर्माण करण्यासाठी विद्रोही कविसंमेलने ठिकठिकाणी झाली पाहिजेत, अशी अपेक्षा संमेलनाचे उद्घाटक पत्रकार दादासाहेब यादव यांनी व्यक्त केली. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पॅन्थर नेते मुरलीधर जाधव, तसेच डॉ. जिभाऊ बच्छाव यांनी कवींच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कविसंमेलनामध्ये जयवंत पवार, वसंत तुमकार, शाहीर सचिन कांबळे, रमेश ओव्हाळ, ज्ञानेश्वर सोनवणे, सचिन भवार, अमित जुगदर, आकाश तोरणे, सुवर्णा भवार, वाघमारे, अ‍ॅड. महेंद्रकुमार लोखंडे, आर. डी. जाधव, प्रफुल्ल रोकडे, किशोर कर्डक, कुशल वाघमारे, अ‍ॅड.संतोष कोकाटे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधनात्मक कविता सादर केल्या. शाहीर सचिन कांबळे यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. या संमेलनामध्ये प्रत्येक अमावास्येच्या रात्री वेगवेगळ्या स्मशानभूमींत कविसंमेलन घेतले जावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संमेलनादरम्यान कैलासधाम स्मशानभूमीमध्ये मानवतेची नि:स्वार्थ सेवा देणारे प्रेम उठवाल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट शाहीर कांबळे यांच्या भैरवी गीताने झाला. रमेश ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)