शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोदार स्कूलला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:43 IST

खराळवाडीच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने ताथवडेच्या इंदिरा नॅशनल स्कूलचा पराभव करीत सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.

पिंपरी : खराळवाडीच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने ताथवडेच्या इंदिरा नॅशनल स्कूलचा पराभव करीत सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित स्पर्धेचा मासूळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलात सांगता झाली. अंतिम सामन्यात पोदार स्कूलने इंदिरा स्कूलवर टायब्रेकरमध्ये ३-१ ने सरशी साधत विजेतेपदावर नाव कोरले. निर्धारीत वेळेत सामन्यात गोलशून्य बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात पोदारकडून मैत्रेय बिराजदार, आदिती गायकवाड आणि आस्था मोरे यांनी गोल केले. इंदिरा स्कूलकडून एकमेव गोल मोनिशा पंधू हिने नोंदविला. दिघीच्या आर्मी पब्लिक स्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. त्यांना शाहूनगरच्या अभिषेक विद्यालय संघाने पुढे चाल दिली.त्यापूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात पोदार स्कूूलने आर्मी पब्लिक स्कूलवर २-० ने सहजविजय मिळविला. त्यांच्या सायली जाधव आणि श्रुती लोंढे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसºया उपांत्य लढतीत इंदिरा स्कूलने अभिषेक विद्यालयावर टायब्रेकरमध्ये ४-३ ने मात केली. गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये इंदिराच्या रिया कुलकर्णी, गायत्री गणगे, कुरणा गेहाणी, वरदा कलाल यांनी तर अभिषेककडून तेजल जाधव, रितू आवटे, अनुजा आदट यांनी गोल केले.त्यापूर्वींच्या साखळी सामन्यात इंदिरा स्कूलने स्पाईन रोड, चिखलीच्या बिकॉन हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये १-० ने सरशी साधली. वरदा कन्नलने गोल केला. अभिषेक विद्यालयाने पिंपरीच्या टाटा मोटर्स विद्यानिकेतनचा सडनडेथमध्ये १-० असा पराभव केला. गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये २-२ बरोबरी झाली होती. टायब्रेकरमध्ये अभिषेककडून तेजल जाधव, संजना तोषीखानी यांनी आणि विद्यानिकेतनकडून दीक्षा कांबळे, निधी खोब्रागडे यांनी गोल केले. सडनडेथमध्ये अभिषेकला साक्षी डोंगरेने विजय मिळवून दिला.