शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी आगारात दहाची नाणी धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 01:33 IST

दहाचे नाणे चलनात असतानाही बँकेकडून ते स्वीकारले जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळापुढे (पीएमपी) मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पिंपरी : दहाचे नाणे चलनात असतानाही बँकेकडून ते स्वीकारले जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळापुढे (पीएमपी) मोठी अडचण निर्माण झाली आहे. दररोज प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात येणारी दहाची नाणी पीएमपी आगारात जमा होत असून, या नाण्यांची अक्षरश: पोती भरून आगारातच ठेवण्याची वेळ आली आहे.शहरातील विविध मार्गांहून पीएमपीच्या शेकडो बस धावतात. दरम्यान, प्रवासावेळी प्रवाशाने तिकिटासाठी दहाचे नाणे दिल्यास अनेकदा वाहकाकडून ते स्वीकारले जात नाही. ‘आगारात नाणी जमा करून घेतली जात नाहीत, तर आम्ही घेऊन काय करू’ असे वाहकाकडून प्रवाशाला सांगितले जाते. दहाचे नाणे चलनात असल्याचे सांगत ते घ्यायला हवे, अशी भूमिका प्रवासी घेतात. यावरून अनेकदा वादावादी होते.बँक नाणी घेत नसल्याने प्रवासात प्रवाशांकडून जमा होणारी नाणी मार्गावरच संपवा, असे वाहकांना सांगण्यात आले आहे. यासह २५ ते ३० रुपयांपेक्षा अधिक चिल्लर आगारात आणू नका, अशीही सूचना दिली आहे. मात्र, दररोज चार ते पाच हजार रुपये भरणा असणाऱ्या एका वाहकाकडे २५ ते ३० रुपयांपेक्षा अधिकच चिल्लर जमा होत असते. अशा वेळी काय करायचे, असा प्रश्न वाहकांपुढे उभा ठाकला आहे.अशी आहे नोटीसपीएमपीकडून होणाºया रोजच्या भरण्यामध्ये एकही दशमान नाण्याचा स्वीकार करणार नाही, असे बँकेने कळविले आहे. तरी वाहकांनी मार्गावर काम करताना प्रवाशांकडून तिकीट आकारणीपोटी आलेले सुटे पैसे दुसºया प्रवाशांस देऊन कमीत कमी सुटी नाणी आगारात भरणा करताना द्यावी. प्रत्येक वाहकाने कमीत कमी २० ते २५ रुपये किंवा त्यापेक्षा कमी नाणी भरावीत. त्यामुळे बँकेत भरणा करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.आगारांमध्येहजारो नाणीप्रवाशांकडून दहाची नाणी येतात. मात्र, बँक त्या स्वीकारत नसल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आगारातच ठेवण्याची वेळ आली आहे. निगडी, नेहरुनगर, तसेच भोसरी आगारात हजारो रुपयांची १० ची नाणी आहेत. भोसरी आगारात ८० हजारांची नाणी पडून आहेत.प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दहाची नाणी येत असतात. मात्र, सध्या बँक ही नाणी स्वीकारत नसल्याने ही नाणी आगारातच ठेवली आहेत. बँकांनी नाणी स्वीकारल्यास सोयीचे होईल.- सतीश गव्हाणे, आगार व्यवस्थापक, निगडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड