शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड स्वमालकीचाच; विकसकाचा दावा

By admin | Updated: June 7, 2017 01:27 IST

मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड व ज्यावर कुंपण बांधले आहे तो भूखंड वेगवेगळा असल्याचा दावा संबंधित विकसकाच्या वतीने करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड व ज्यावर कुंपण बांधले आहे तो भूखंड वेगवेगळा असल्याचा दावा संबंधित विकसकाच्या वतीने करण्यात आला आहे. महापालिकेने मात्र हा भूखंड एकच असल्यावरून न्यायालयात दावा दाखल झाला व त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला असल्याचे स्पष्ट केले आहे. या जागेबाबत न्यायालयाच्या जैसे थे आदेशाचा भंग केल्यावरून महापालिकेने दाखल केलेल्या अवमान याचिकेची सुनावणी ८ जूनला होणार आहे.गेल्या महिनाभरापासून मित्रमंडळ चौकातील सुमारे ९ एकर भूखंडांचे प्रकरण महापालिकेत गाजते आहे. काँग्रेसचे माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी याविरोधात महापालिका प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यानंतर महापालिकेने अवमान याचिका दाखल केली आहे. मात्र याबाबत बोलताना सुभाष जगताप यांनी सांगितले की महापालिकेने फक्त त्या जागेवर विकसकाने घातलेले कुंपण काढण्याचा आदेश द्यावा. >मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी आयुक्तांचीमहापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी हा संपूर्ण ९ एकरांचा भूखंड महापालिकेचाच असल्याचे सांगितले. त्याचा क्रमांक एकच आहे, त्याचे प्लॉट पडलेले नाहीत, त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता व त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेच्या बाजूने लागला आहे, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने मूळ जागामालकाचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा आदेश कनिष्ठ न्यायालयाला दिला. त्यानंतरही निकाल महापालिकेच्याच बाजूने लागला. त्याविरोधात अपील करण्यात आले असून, त्याची सुनावणी प्रलंबित आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.दरम्यान, या सर्व प्रकरणांत महापालिका प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त कुणाल कुमार का गप्प आहेत, असा सवाल बागुल यांनी केला. महापालिकेच्या सर्व मालमत्ता सांभाळण्याची अंतिम जबाबदारी आयुक्तांची आहे. या प्रकरणात त्यांच्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणा झाला आहे हे उघड दिसत असूनही आयुक्त काही करायला तयार नाहीत, ते राजकीय दबावाखाली येऊन काम करीत आहेत हे यातून स्पष्ट दिसते आहे, असा आरोप बागुल यांनी केला.सुभाष जगताप यांनीही संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, महापालिकेच्या मालकीची जागा हडप करण्याचा हा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगितले.