शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगरला बस टर्मिनलचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:03 IST

प्रवाशांची सोय : बी. पी. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नियुक्तीचा निर्णय

पिंपरी : संभाजीनगर येथे बस टर्मिनल आरक्षण विकसित करण्यात येणार आहे. या टर्मिनलचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वास्तुविशारद म्हणून पी. के. दास यांची नेमणूक केली होती. मात्र, ही नेमणूक रद्द करून आराखड्याला गती देण्यासाठी बी. पी. सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्र्रभाग क्रमांक ९ संभाजीनगर, चिंचवडमधील भूखंड बस टर्मिनलसाठी आरक्षित केला आहे. त्यासाठी सन २०१३-१४ पर्यंत या कामाचा विकास आराखडा विशेष योजनेंतर्गत टप्पा क्रमांक दोनमध्ये समावेश केला होता. या कामात बस टर्मिनल आणि त्या अनुषंगाने इतर कामांचा समावेश होता. या कामासाठी वास्तुविशारद म्हणून मे. पी. के. दास या संस्थेची नेमणूक केली. त्याचबरोबर नकाशे आणि अंदाजपत्रकतयार करण्याचे कामही याच संस्थेला दिले. यासाठी महापालिका आयुक्तांच्या प्रस्तावानुसार केलेल्या कामाचे कौन्सिल आॅफ आर्किटेक्ट अन्वये २५ लाख रुपये महापालिकेने दिले. मात्र, ३१ आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या आढावा बैठकीत या कामात प्रगती होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कामाचे सुधारित नकाशे आणि अंदाजपत्रके आठवडाभरात सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पी. के. दास यांना केल्या.

या कामाबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही नगरसेवक व प्रशासनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १४ डिसेंबर २०१८ ला पी. के. दास या संस्थेची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले. हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण असल्याने संकल्पचित्रे, आराखडे तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, पूर्वगणनपत्रक, निविदाविषयक कामे व निविदापूर्व कामांसाठी आर्किटेक्टची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्याशिवाय दैनंदिन कामावर देखरेख, निविदापश्चात कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व कामांसाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प सल्लागार असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते.

बांधकामासाठी पुन्हा निविदाप्रक्रिया४आराखड्याच्या कामाला गती देण्याची तयारी के. बी. पी. सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या संस्थेने दर्शविली आहे. त्यामुळे संभाजीनगर येथे बस टर्मिनल विकसित करण्याच्या कामासाठी वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली आहे. या संंस्थेला आॅडिटोरियम वगळून पुन्हा बांधकाम परवानगी घेऊन, पूर्ण अंदाजपत्रक व निविदा कार्यवाही करावी लागणार आहे. निविदापूर्व आणि निविदापश्चात वास्तुविशारद कामासाठी १.८१ टक्के, तर प्रकल्प सल्लागार म्हणून १.३५ टक्के शुल्क देण्यात येणार आहे.