शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : शहरात आत्महत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 06:58 IST

नोकरी नाही, त्यातच आजारपण यामुळे आलेल्या नैराश्यापोटी भोसरीत सिद्धेश्वर कॉलनीत राहणा-या चंद्रकांत काशिनाथ जाधव याने...

पिंपरी : रुपीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. प्रभाकर केशव पांचाळ (वय ६५, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर पांचाळ या वयोवृद्ध गृहस्थाने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. नेमके आत्महत्येमागील कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.अल्पवयीन मुलीची भोसरीत आत्महत्त्या-पिंपरी : भोसरीतील डोळस वस्ती येथे १३ वर्षांच्या मुलीने घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी साडेतीनला उघडकीस आला. खुशी माऊली सिंग असे या मुलीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशीचे वडील कामाला गेले होते. त्या वेळी तिची आई घरात होती. मात्र, दुसºया खोलीत जाऊन खुशीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. खुशी सातवीत शिकत होती. ती अभ्यासत कच्ची असल्याने काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी तिच्या पालकांना शाळेत बोलावले होते. खुशी अभ्यासात कमी असल्याची समज या वेळी पालकांना देण्यात आली. त्यानंतर ती नाराज होती. त्यामुळे नैराश्यापोटी तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिचे वडील सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून गहुंजे येथे काम करतात.नैराश्यापाटी एकाने पेटवून घेतले-पिंपरी : नोकरी नाही, त्यातच आजारपण यामुळे आलेल्या नैराश्यापोटी भोसरीत सिद्धेश्वर कॉलनीत राहणा-या चंद्रकांत काशिनाथ जाधव (वय ४८) याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात १०० टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी ११ च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर काशिनाथ जाधव हे ४८ वर्षे वयाचे गृहस्थ गेल्या काही दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत होते. रोजगार नव्हता, त्यातच आजाराच्या उपचारासाठी औषधोपचाराचा खर्च होत होता. आजारपणाला कंटाळून त्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Suicideआत्महत्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड